विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:46 AM2019-07-29T01:46:18+5:302019-07-29T01:46:47+5:30
शाळा, महाविद्यालयाचे उपहारगृह अन् घरच्या डब्यासाठीही मार्गदर्शक तत्त्वे
मुंबई : प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपहारगृहात अथवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली असून, त्याची जुलै ते डिसेंबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे़ त्यासाठी शाळा, महाविद्यालयात जागरूकता निर्माण करून जंक फूडला हद्दपार करीत डब्याचा ८० टक्के भाग हरीत पदार्थांचा असावा, अशी सूचना केली आहे़
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे यांनी संपूर्ण वर्षभराचा पोषण आहार कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांना कळविला आहे़ राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना मान्य केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक शाळेत आरोग्य समिती असेल ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक असतील़ ज्याद्वारे शाळा, महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये दिले जाणारे पदार्थ, भोजन आरोग्यदायी होईल याची काळजी घेतली जाईल़ जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याची काळजी शाळांनी घ्यायची आहे़ तसेच जिथे मुले घरून डबा आणतात त्या शाळांनी पालकांना विश्वासात घेऊन पोषक आहाराचा समावेश केला पाहिजे़
आरोग्य सदृढ रहावे यासाठी हिरव्या पालेभाज्य व कडधान्यावर भर देणे आवश्यक आहे़
पॅकिंग पदार्थांमुळे मुले घरचे पदार्थ खात नाहीत़़़
४जंक फूड हे आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग होत आहे़ त्याचा मुलांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे़ त्यामुळे घरून आणला जाणारा डबा व कँटिनमधील पदार्थांमध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत़
४कँटिनच्या भोजनात जंकफूड नाहीसे करण्याचे आदेश दिले आहेत़ पोषक आहार नसल्यामुळे मुले एचएफएसएस अर्थात हाय फॅट शुगर अँड सॉल्ट म्हणजेच ज्यामध्ये मेद, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त आहे, असे पदार्थ खातात़
४आकर्षक जाहिरातींमुळे कमी किमतीतील पॅकिंगमधील पदार्थांची सवय लागते़ ज्यामुळे घरी बनविलेले पदार्थ मुले खात नाहीत़ त्याचे दुष्परिणाम म्हणून आवश्यक कार्बोदके व प्रथिने मुलांना मिळत नाहीत़
४दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना आपल्या संस्थेत दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनुची माहिती आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना द्यावी लागेल़ तसेच सहाय्यक आयुक्त व आरोग्य समन्वयक शाळांना भेट देवून आढावा घेतील़
आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कार्यशाळा
४शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्य समिती, विद्यार्थी, पालक यांना पोषक आहाराचे महत्व सांगण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन अन्न व प्रशासन विभाग करणार आहे़ त्याचा अहवाल डिसेंबरमध्ये पाठवून शाळा, महाविद्यालयात दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनूमध्ये बदल केला जाणार आहे़
महापालिकेच्या शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून पोषक आहार वितरित केला जातो. या आहारातील पदार्थ महासभेच्या मान्यतेने ठरविण्यात आले आहेत. शासनानाच्या सूचनांनुसार खाजगी शाळा आणि महाविद्यालयात जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याबाबत सूचना तसेच जनजागृती करण्यात
येणार आहे.
- नितीन काळे, उपायुक्त, नवी मुंबई शिक्षण विभाग