शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

माथेरानमध्ये आरोग्यसुविधाही ब्रिटिशकालीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:41 AM

स्थानिकांची गैरसोय : बेरामजी जिजीभाई रुग्णालय आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरान व परिसरातील आदिवासी बांधवांसाठी, तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना उपचारासाठी येथे असलेले बेरामजी जिजीभाई रुग्णालय आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एकशे अठरा वर्षे उलटून गेल्यानंतरही हे रुग्णालय आजही जैसे थे याच निकषावर सुरू असल्याने माथेरानमधील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे.शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेले ब्रिटिशकालीन रुग्णालय आजही माथेरानमध्ये सुरू आहे. सेठ बेरामजी जिजीभाई यांच्या स्मरणार्थ इस.१८७२च्या ट्रस्ट सेटलमेंटमधून शेठ रुस्तमजी बेरामजी जिजीभाई यांनी या रुग्णालयाची इमारत बांधण्याकरिता आणि ती सज्ज करण्याकरिता १३ हजार १०० रुपयांची रक्कम दिली. ३ जून, १९०२मध्ये हे रुग्णालय सुरू झाले. म्हणजे शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेले हे रुग्णालय आजही त्याच स्थितीत आहे. माथेरानमधील पर्यटन या काळात भरभराटीस आले. मात्र, दुर्दैवाने माथेरानमधील या रुग्णालयातील सुविधा मात्र दिवसेंदिवस कमी-कमी होत गेल्या. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात, हा भाग डोंगराचा प्रदेश तर येथील प्रवासाचे प्रमुख वाहन घोडा, त्यामुळे येथे अनेक वेळा अपघात होत असतात, तर येथील स्थानिकांनाही जुजबीच उपचार येथे मिळत आहेत. अनेक वर्षांपासून हे रुग्णालय अद्ययावत व्हावे, म्हणून मागणी सुरू आहे. मात्र, त्याकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. फक्त अपघात झाल्यावरच हा प्रश्न उपस्थित केला जातो व नंतर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याची मागील काही काळात प्रचिती सर्वांना आली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे, रुग्णालये कमी पडत आहेत आणि माथेरानमध्ये शासनाचे स्वत:चे रुग्णालय असताना, येथील रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. तुटपुंज्या सुविधांसह येथील वैद्यकीय अधिकारी माथेरानकरांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा मागणी करूनही शासन दाद देत नसल्याची खंत त्यांनाही आहे.