उदय कळस म्हसळा : रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत; परंतु त्या तालुक्यात श्रीवर्धन म्हसळा, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, पाली अशा तालुक्यांत केवळ ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तर प्राथमिक आरोग्यकेंद्र, गावामध्ये आरोग्य उपकेंद्र यांच्या पलीकडे रुग्णांसाठी सुखसोर्इंनी परिपूर्ण असे एकही रु ग्णालय नाही. आरोग्यकेंद्र आहेत त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. बहुतांश आरोग्यकेंद्रात डॉक्टर आहेत तर कसलीही मशिनरी नाही. काही आरोग्यकेंद्रात उपकरणे आहेत तर त्यातले टेक्निशियन कर्मचारी नाहीत. अशा परिस्थितीत रायगडचा दक्षिण भाग आरोग्याच्या सेवेपासून वंचित असून रुग्णांची उपेक्षा होत आहे.
श्रीवर्धन, म्हसळा, तळा अशा डोंगराळ आणि दुर्गम तालुक्यातील रुग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत. अशा रुग्णांना पनवेल, मुंबई अशा ठिकाणी हलविण्याशिवाय पर्याय नसतो. एखाद्याचा साधा दुचाकीवरून अपघात झाला तर त्याला माणगावला त्वरित हलवावे लागते. रुग्ण गंभीर असेल तर त्याला अधिक उपचारासाठी अलिबाग किंवा पनवेलला न्यावे लागते. अशातच योग्य उपचार वेळेत न झाल्यास बऱ्याच वेळा रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. म्हसळा, तळा तालुक्याची अवस्था अगदी नाजूक आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर हजारो नागरिक कायमचे जायबंदी झाले. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय रुग्णालयातील अपुºया व्यवस्थेमुळे अनेकांनी रुग्णालयातच आपले प्राण सोडले तर अनेकांना पुढील उपचारासाठी मुंबईलानेताना रस्त्यातच प्राण गमावावे लागले.
रायगड जिल्ह्णातील रुग्णालयांची अवस्था बिकट आहे, त्यामुळे रायगडमधल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी एकत्र यावे आणि माणगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुसज्ज असे रु ग्णालय उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नागरी सुविधा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. आरोग्यविषयक दर्जेदार सुविधांसाठी माणगाव ते महाड दरम्यान सोयी-सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय व्हावे, यासाठी माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करण्यात आले होते. प्रसूती दरम्यान काही अडचण आली आणि सीझर करावे लागले तरी यासाठी त्या महिलेला माणगाव अथवा श्रीवर्धनला जावे लागते. अशा परिस्थितीत म्हसळा-माणगावच्या प्रवासामध्ये कित्येक बालकांचा मृत्यू झाला आहे.खासगी रुग्णालयात धावम्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेमून दिलेले डॉक्टर, कर्मचारी हेदेखील कार्यरत नाहीत. पर्यायाने येथील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. शासनाच्या निकषानुसार नेमून दिलेली आरोग्यसेवा येथील तिन्ही तालुक्यांमध्ये उपलब्ध होत नाही. तळा ग्रामीण रुग्णालयात २०१४ ला भूमिपूजने झाले; परंतु अद्याप इमारत झालेली नाही. तसेच पाली रुग्णालयाचे २०१४ मध्ये तीन वेळा भूमिपूजन झाले तरीदेखील आजपर्यंत तेथे इमारत उभारलेली नाही. त्यामुळे विराजमान होणाºया नवीन सरकारने कोकणातील नागरिकांसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील पनवेल आणि महाड येथे ट्रामा केअर सेंटर आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी नागाठणे येथील जमिनीची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. नागोठणे हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्या जागेची निवड केली आहे. जमीन मिळाली तर तेथे मल्टिस्पेशालिटी, ट्रामा केअर आणि मॅटिर्निटी असे ५० बेडचे हॉस्पिटल सुरू होऊ शकेल. त्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. -डॉ. अजित गवळी, जिल्हाशल्य चिकित्सक, रायगड