शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

दीड कोटींच्या दरोडा प्रकरणाची सुनावणी

By admin | Published: April 17, 2016 1:18 AM

पाली येथे सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून दीड कोटी रकमेचा दरोडा टाकून लुटण्यात आलेल्या बहुचर्चित दरोडा प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात लवकरच सुरू होणार

अलिबाग : पाली येथे सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून दीड कोटी रकमेचा दरोडा टाकून लुटण्यात आलेल्या बहुचर्चित दरोडा प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात लवकरच सुरू होणार असून, या खटल्याप्रकरणी विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून सरकारतर्फे अ‍ॅड. विलास नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.रायगड पोलिसांना १० आरोपी अटक करण्यात यश आले आहे. पाली येथील ज्वेलर्स रमेश भिकमचंद परमार यांनी या दरोड्याची तक्रार पाली पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यामध्ये विनोद गुडेकर, भगवान महाडीक, दिनेश, नीलेश महाडीक, संतोष महाडीक, दीपक महाडीक, हरिश्चंद्र गुडेकर, आदित्य भुजबळ, स्वप्नील आरणे व अजित शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात वापरलेली मारु ती सुझुकी कार, यामाहा मोटारसायकल, एक एअरगन व काही हत्यारे जप्त करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. विलास नाईक यांनी दिली.बनावट दरोडा पडल्याचे दाखवून, १ कोटी ३४ लाखांची रोकड लंपास करण्याचा गुन्हा गेल्या १५ मार्च रोजी पायरीची वाडी येथे हरीराम दळवी यांच्या फार्महाऊसवर घडला होता. तक्रारदार व अन्य व्यापारी साक्षीदार यांना स्वस्त दरात सोने देतो असे सांगून त्यांना फार्महाऊसवर सोने खरेदीसाठी बोलवायचे व खोटे सोने दाखवून पैसे ताब्यात घेतल्यावर कटकारस्थान करून सशस्त्र दरोडा पडला असे दाखवून लुटायचे, असा बेत आरोपींनी संगनमताने आखला होता. त्याप्रमाणे साक्षीदार फार्महाऊसवर आल्यावर त्यांना माराहाण करून त्यांच्या गाड्यांच्या चाव्या व मोबाइल फोन काढून घेऊन १ कोटी ३४ लाखांचा धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. याबद्दलची फिर्याद नोंदविल्यावर पाली पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार अशोक विठ्ठल पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक्क यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील रक्कम, लपवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले. विशेष म्हणजेच कोट्यवधी रु पयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)