- जयंत धुळप
अलिबाग- दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि खून खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज निकाल आहे. २४ मार्च २०१२ला ही घटना घडली होती. यात महादेव गोपाळ घडशी आणि अनंत बापू भगत या दोघांचा खुन करण्यात आला होता. तर सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचिन मुर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता.. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशन मध्ये १२ जणांविरुध्द भादवी कलम ३९६.३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती. या प्रकरणी तपासी अधिकारी संजय शुक्ला आणि वि वी गायकवाड यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले होते. तेव्हा पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. विशेष मोक्का न्यायाधिश के आर पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकुण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासी अधिकारी, पंच साक्षीदार, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, सिसीटिव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरणार आहेत.
मंदीरातील सिसीटिव्ही कॅमेरयात कैद झालेल्या आरोपींचे शुटींग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलीसांना यश आलेआहे. याशिवाय दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या पहारी, चोरीला गेलेली दानपेटी, आरोपींकडून १ किलो २४६ ग्रॅम सोन्याची लगडी हस्तगत करण्यात पोलीसांना आलेले यश महत्वपुर्ण ठरले. या प्रकरणात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फ ९ वकीलांनी आपली बाजू मांडली.
आरोपींची नावे,
१.नवनाथ विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर
२.कैलास विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर
३.छोट्या उर्फ सतीश जैनु काळे- बिलोणी औरंगाबाद
४.आनंद अनिल रायमोकर- बेलंवडी श्रीगोंदा(सोनार)
५.अजित अरुण डहाळे-धारगाव श्रीगोंदा(सोनाराचा सहकारी)
६.विजय उर्फ विज्या बिज्या काळे कोळगाव,अहमदनगरज्
७.ज्ञानेश्वर विक्रम भोसले, मोळवाडी घोसपुरी
८.गणेश विक्रम भोसले- मोळवाडी घोसपुरी
९.खैराबाई विक्रम भोसले, मोळवाडी
१०.विक्रम हरिभाऊ भोसले, मोळवाडी
११.कविता उर्फ कणी राजू काळे, हिरडगाव श्रीगोंदा
१२.सुलभा शांताराम पवार, लोणी