शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 9:57 AM

इर्शाळवाडीत शोधमोहिमेत अडचणींचा डोंगर; मृतांची संख्या २२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कइर्शाळवाडी/अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी एनडीआरएफच्या बचाव पथकाला शुक्रवारी सहा मृतदेह काढण्यात यश आले. मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, सोबतच धुके असल्याने बचाव व शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. दुर्गंधीही येत आहे. अजूनही १७ घरे ढिगाऱ्याखाली आहेत. 

माणसे आणि मुक्या प्राण्यांना वाचविण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही मोठी साधनसामग्री घटनास्थळावर पोहोचू शकत नसल्याने ढिगारा उपसण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी यंत्रणेसोबत सामाजिक संस्थाही मदतकार्यात सहभागी होऊन काम करीत आहेत. 

इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. त्यानंतर तातडीने खालापूरचे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सकाळी साडेचारपर्यंत एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शोध व बचाव मोहिमेला गती आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. 

शुक्रवारी आणखी सहा मृतदेह शोधण्यात यश

पावसामुळे चिखल झाला असल्याने घराचा एक-एक भाग शोधला जात आहे. सकाळी दहा वाजता एक मृतदेह सापडला. त्यानंतर दिवसभरात सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. कोणी व्यक्ती ढिगाऱ्याखाली जिवंत आहे का, याचा शोध एनडीआरएफचे पथक घेत आहेत.

मृतांची नावेn रवींद्र पदू वाघ (वय ४६)n कमल मधू भुतांब्रा (वय ४५) n कान्ही रवी वाघ (वय ४५)n हासी पांडुरंग पारधी (वय ५०)n मधू नामा भुतांब्रा (वय ५५)n पांडुरंग धावू पारधी (वय ५५)

दरडग्रस्त कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू खालापूरचे प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच रिलायन्स, टाटा कंपन्याचे मनुष्यबळ, इमेजिका, खोपोली नगरपालिका आदींचे पथक घटनास्थळी आहेत. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लायन्स क्लब (खोपोली) आणि अन्य संस्थांकडून दरडग्रस्त कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध जीवन उपयोगी वस्तू पीडित कुटुंबांना देण्यात येत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRainपाऊस