विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सोमवारपासून पडत असलेल्या संततधार पावसाने रायगड जिल्ह्णास अगदी झोडपून काढले आहे. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सायंकाळी पूर रेषेस पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने ग्रामस्थांनी नि:श्वास टाकला असून पुराचा धोका आता पूर्णपणे टळला आहे. पावसाअभावी भात लावणीची खोळंबलेली कामे मात्र चालू आहेत. परिवहन मंडळाच्या बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.२४ तासांत जिल्ह्यात पावसाची नोंद ...अलिबाग२१५ मि.मी.पेण१६० मि.मी.पनवेल१४५ मि.मी.कर्जत१२६ मि.मी.माणगाव१३७ मि.मी.सुधागड१३९ मि.मी.महाड१२७ मि.मी.म्हसळा१४५ मि.मी.मुरुड१४२ मि.मी.उरण१४८ मि.मी.खालापूर०६४ मि.मी.रोहा१६२ मि.मी.तळा१४८ मि.मी.पोलादपूर११५ मि.मी.माथेरान१४८ मि.मी.
रायगड जिल्ह्यात धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 3:06 AM