शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अतिवृष्टीचा मुरूड तालुक्यातील 25 गावांना बसला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 9:24 AM

रस्ते, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला : घरांमध्ये शिरले पाणी

ठळक मुद्देदरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : गेल्या २४ तासांत एकट्या मुरूड तालुक्यात तब्बल ४७५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. रात्रभर धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे मुरूडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने २५ गावांतील घरांमध्ये पाणी शिरले हाेते. मच्छीमार बाेटीसह रस्ते खचून काही पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे वांदेली, काकळघर, आदड, चिकणी, विहूर,  भोईघर आणि वांडेली या गावांचा संपर्क  तुटला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.  

काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मुरूड तालुक्याला बसला आहे. बोरली, मांडला, काकलघर, मुरूड, शिगरे, खतीब खार, आंबोली, सायगाव, वांदे, उंडर गाव, तेलवडे, खारीकवाडा, मजगाव, खरदोनकुळे, विहूर, मोरे, नांदगाव, काशीद, चिकणी, वालवती, आदाड, उसरोली, वेलास्ते, चोरधे, साळाव, अशा एकूण २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरले हाेते. यामुळे गावातील एक हजार ५५० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय दुकाने, टपऱ्यांचेही नुकसान झाले आहे.  रात्री भरतीसोबतच जोरदार पावसाने हजेरी दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बोर्ली व मांडला येथील घरांत पाच ते सात फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे मुरूडकरांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवारी पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने सकाळपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिल्याने पावसामुळे अलिबाग- मुरूड रस्त्यावरील विहूर गावाजवळ रस्ता एका बाजूने चांगलाच खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. पाऊस सुरू असताना समुद्रानेही राैद्ररूप धारण केले हाेते. त्यामुळे महाकाय लाटा उसळत असल्याने मुरूडमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात मच्छीमारांनी शाकारून ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून मच्छीमार बोटींची प्रचंड हानी झाली आहे. एकदरा समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या बोटींचेही नांगर तुटले आहेत. समुद्रांच्या लाटांच्या माऱ्यामुळे त्या थेट मुरूडच्या समुद्र किनारी आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

राेहा-मुरूड रत्यावर मध्यरात्री दरड काेसळल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली हाेती. पावसाचा जाेर थांबल्यानंतर सकाळी दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दरड हटवल्यानंतर मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.-सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस