पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:24 AM2019-06-28T02:24:08+5:302019-06-28T02:24:53+5:30

अलिबाग पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे.

Heavy rains of the rains, the beggars dry | पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

Next

अलिबाग : पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६.५३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून गुरु वार अखेर एकूण सरासरी १७९.०८ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस पोलादपूर तालुक्यात झाला आहे, तर सर्वात कमी माथेरान तालुक्यात झाला आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. या कालावधीत येणाऱ्या संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २९ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबईसह पालघर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पाऊस तुफान फटकेबाजी करणार असल्याने प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. काही मिनिटांमध्येच सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुपारी ४ वाजताच सायंकाळी ७ वाजता जसा अंधार असतो तशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

जिल्ह्यामध्ये दरवर्षी ७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वेळी २७ जूनपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसानंतर शेतामध्ये राब टाकण्यात आला होता; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने राब करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी बळीराजा सुखावला आहे. पाऊस बरसल्याने दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.

नागरिकांची तारांबळ
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहाटेपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे. यामुळे नोकरीला जाणाºयांची व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, नंतरच्या काळात गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, गुरु वारी पावसाने दर्शन दिल्यामुळे थोडा का होईना पण शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुरुडसह परिसरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होती त्यामुळे नगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई दावा फोल ठरल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात रस्ते जलमय झाले. त्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. मुरुड तहसीलदार कार्यालयातून पावसाची २२ मि.मी.नोंद आहे.

म्हसळा येथे ५२ मि.मी. पाऊस
म्हसळा : तालुक्यातील विविध भागात गुरु वारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिपही सुरू आहे. यामुळे चाकरमानी व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर आकाशाकडे डोळे लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी मात्र सुखावला आहे.
दडी मारलेल्या पावसाने अचानक धुवाधार बरसण्यास सुरुवात के ल्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. म्हसळा तहसीलदार कार्यालयातून पावसाची ५२ मि.मी. नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूरमध्ये पाऊस
पोलादपूर : तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाली असून बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामासाठी सज्ज झाला आहे, तसेच नुकतीच पेरणी होऊन गेल्यामुळे या पडलेल्या पावसामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे होणार आहे.

Web Title: Heavy rains of the rains, the beggars dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.