शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 2:24 AM

अलिबाग पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे.

अलिबाग : पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६.५३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून गुरु वार अखेर एकूण सरासरी १७९.०८ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस पोलादपूर तालुक्यात झाला आहे, तर सर्वात कमी माथेरान तालुक्यात झाला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. या कालावधीत येणाऱ्या संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २९ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबईसह पालघर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पाऊस तुफान फटकेबाजी करणार असल्याने प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. काही मिनिटांमध्येच सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुपारी ४ वाजताच सायंकाळी ७ वाजता जसा अंधार असतो तशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.जिल्ह्यामध्ये दरवर्षी ७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वेळी २७ जूनपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसानंतर शेतामध्ये राब टाकण्यात आला होता; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने राब करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी बळीराजा सुखावला आहे. पाऊस बरसल्याने दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.नागरिकांची तारांबळआगरदांडा : मुरुड तालुक्यातील भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहाटेपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे. यामुळे नोकरीला जाणाºयांची व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, नंतरच्या काळात गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, गुरु वारी पावसाने दर्शन दिल्यामुळे थोडा का होईना पण शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुरुडसह परिसरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होती त्यामुळे नगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई दावा फोल ठरल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात रस्ते जलमय झाले. त्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. मुरुड तहसीलदार कार्यालयातून पावसाची २२ मि.मी.नोंद आहे.म्हसळा येथे ५२ मि.मी. पाऊसम्हसळा : तालुक्यातील विविध भागात गुरु वारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिपही सुरू आहे. यामुळे चाकरमानी व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर आकाशाकडे डोळे लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी मात्र सुखावला आहे.दडी मारलेल्या पावसाने अचानक धुवाधार बरसण्यास सुरुवात के ल्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. म्हसळा तहसीलदार कार्यालयातून पावसाची ५२ मि.मी. नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पोलादपूरमध्ये पाऊसपोलादपूर : तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाली असून बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामासाठी सज्ज झाला आहे, तसेच नुकतीच पेरणी होऊन गेल्यामुळे या पडलेल्या पावसामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे होणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस