मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल
By जमीर काझी | Published: December 24, 2022 09:49 PM2022-12-24T21:49:01+5:302022-12-24T21:49:22+5:30
दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती.
अलिबाग: नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मुंबई- गोवा महामार्ग वाहनांनी भरून गेला आहे. वडखळ येते गोव्याच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर वर वाहनाच्या रांगा लागू राहिल्या होत्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्यावरील अपूर्ण कामे व बेस्त वाहनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. वाहनांना मार्ग काढून देताना पोलीसही हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
क्रिसमस व थर्टी फर्स्ट चा जल्लोष साजरा करण्यासाठी तरुणाई बरोबरच आबालवृत्त सज्ज झाले आहेत सलगच्या सुट्ट्यामुळे नववर्षाचे स्वागत बाहेर करण्यासाठी सहकुटुंब बाहेर पडले आहेत 'विकेंड 'मुळे शनिवारी सकाळपासून मुंबई नवी मुंबई ठाणे येथून नागरिक फिरण्यासाठी रायगड व कोकणाकडे येण्यासाठी बाहेर पडले. परिणामी मुंबई -गोवा महामार्गवर हजारो वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली. वडखळ बायपास येथे ब्रिजखली येथे रस्तावर मोठे खड्डे खराब असल्याने त्या ठिकाणी अतिशय ह हळुवारपणे वाहने न्यावी लागतात त्यामुळे त्याचप्रमाणे अनेकांनी वाहतुकीची शिस्त न पाळता पुढे जाण्यासाठी हव्या त्या पद्धतीने गाडी आपल्या गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ओळख जंक्शन जवळ वाहनांची मोठी कोंडी झाली.
दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती. सुमारे अर्धा किलोमीटर चा रस्ता पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत होते रात्री उशिरापर्यंत अशीच परिस्थिती होती रविवारी व त्या आठवड्याभरात ही पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याने वाहतुकीची समस्या आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे.