- आविष्कार देसाई, अलिबागहागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या. आज आॅक्टोबर अखेर तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ ६२ ग्रामपंचायतींनी तो पल्ला गाठला आहे. २०१९ पर्यंत हागणदारीमुक्तीचे बिरुद मिरविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना झोकून देऊन काम करावे लागणार असल्याचे चित्र आहे.२०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायती या हागणदारीमुक्त करण्याचा रायगड जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. सरकारने दिलेले लक्ष पेलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र ग्रामपंचायतींकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नसल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीमधील तलाठी, ग्रामसेवक यांनी याकामी स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. मार्च २०१६ पर्यंत २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष असून येत्या पाच महिन्यात हे उद्दिष्ट गाठण्याचा खडतर प्रवास ग्रामपंचायतींना करावा लागणार आहे. जून महिन्यात ४७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या होत्या. त्यानंतर पुढील तीन महिन्यात ५ आॅक्टोबरपर्यंत तो आकडा फक्त १५ ने वाढून ६२ वर पोचला. महाड तालुक्यातील १३४ पैकी १६ ग्रामपंचायती या हागणदारी मुक्त करीत महाडने टॉप फाईव्हच्या यादीच प्रथम स्थान पटाकावले आहे.हागणदारीमुक्त करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्याबरोबरीनेच लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. तो प्राप्त व्हावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.-पुंडलिक साळुंंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तालुकाग्रामपंचायतीहागणदारीमुक्तमहाड १३४ १६ म्हसळा ४० १५ श्रीवर्धन ४३ १० उरण ३४ ०५पनवेल ५१ ०५ कर्जत ५० ०२पोलादपूर ४३ ०२रोहे ६४ ०२अलिबाग ६२ ०१खालापूर ४२ ०१माणगाव ७४ ०१पेण ६३ ०१तळा २६ ०१मुरुड २४ ००सुधागड ३४ ००पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. उरण, पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, रोहे तालुक्यांना अर्बन टच आहे. त्या ग्रामपंचायतींचे काम मात्र तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होेते.
‘हागणदारीमुक्त’ आलेख घसरला
By admin | Published: October 05, 2015 11:58 PM