उरण : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणाऱ्या आणि गड किल्ले संवर्धन व संरक्षणाचे कार्य हाती घेतलेल्या ह्यदुर्ग मावळा प्रतिष्ठान या संघटनेतर्फे उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
द्रोणागिरी किल्ल्याची झालेली दुरवस्था व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोणातून द्रोणागिरी किल्ल्यावर संघटनेतर्फे संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली होती. किल्ल्यावर साचलेला पालापाचोळा, प्लास्टिकच्या बाटल्या केरकचरा काढण्यात आला.
गडावरील मागील बाजूस चोर दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेला बुरुजालगतची माती काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या आचार विचारांवर प्रेम करणारे हे मावळे गडकिल्ल्यावरील साफसफाई मोहीमेत एकत्र आले होते. यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश कावळे आदिंसह शिवभक्त उपस्थित होते.