रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे हेल्मेट रॅली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:12 PM2024-02-07T17:12:59+5:302024-02-07T17:13:16+5:30

या मोटार सायकल हेल्मेट रॅलीमध्ये महिला व पुरुष अशा ६१ मोटार सायकल स्वार सहभागी झाले होते.

Helmet rally at Uran under road safety campaign | रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे हेल्मेट रॅली 

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे हेल्मेट रॅली 

उरण (मधुकर ठाकूर): रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे. बुधवारी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटार सायकल हेल्मेट रॅलीमध्ये महिला व पुरुष अशा ६१ मोटार सायकल स्वार सहभागी झाले होते.

रस्ता सुरक्षाही काळाची गरज आहे. जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षते विषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. उरण येथील वाढत असलेली वाहनसंख्या पाहाता रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी बुधवारी (७) मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.उरणमध्ये आयोजित करण्यात आलेली रॅली केअर पाॅईंट नाका, बोकडवीरा, द्रोणगिरी काॅलनी,नविन शेवा अशी फिरवत केअर पाॅईंट येथे सांगता करण्यात आली.या मोटार सायकल हेल्मेट रॅलीमध्ये महिला व पुरुष अशा ६१ मोटार सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता.

रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्यावरुन येणा-या बिना हेल्मेट वाहन चालविणा-या मोटार सायकल स्वारांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षतेबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरीक्षक प्रविण बाबर, विकास मालवे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशोक वारे,महेश माने व त्यांचे सहकारी तसेच श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कुलचे संस्थापक बळीराम ठाकुर, जितेंद्र प्रधान, दानिश मुकरी,प्रितम पाटील आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Helmet rally at Uran under road safety campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.