हेटवणे-शहापाडा धरणे जोडणार

By Admin | Published: November 21, 2015 12:47 AM2015-11-21T00:47:52+5:302015-11-21T00:47:52+5:30

शहापाडा धरण पेयजल योजनेतील वाशी, शिर्की, मसूद खारेपाटातील १० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांकरिता ३३.२७ कोटी खर्चाची हेटवणे-शहापाडा

Hetwah-Shahapada dams to be added | हेटवणे-शहापाडा धरणे जोडणार

हेटवणे-शहापाडा धरणे जोडणार

googlenewsNext

पेण : शहापाडा धरण पेयजल योजनेतील वाशी, शिर्की, मसूद खारेपाटातील १० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांकरिता ३३.२७ कोटी खर्चाची हेटवणे-शहापाडा धरणांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मुहूर्त सापडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी ८ जून २०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसर शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे सर्वेक्षण महाराष्ट्रजीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले आहे.
गेले पंधरा वर्षे वाशी खारेपाटाचा गंभीर प्रश्न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी भिजत पडला होता. फडणवीस सरकारने वर्षपूर्तीनिमित्त वचनपूर्ती कार्यक्रम थेट जनतेच्या दरबारी सरकारचा एक वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातोय. या अनुषंगानेच ‘पंधरा वर्षे आश्वासनाची एक वर्ष वचनपूर्तीचे’ या संकल्पनेत पेण खारेपाटाची पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून हेटवणे धरणाचे पाणी थेट शहापाडा धरणात आणण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचा आधार घेतला आहे.
शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले आहे. या सर्वेक्षण कामासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४ लाख ३३ हजारांचा निधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यांची उपांगनिहाय अंदाजित किंमत ३३ कोटी २७ लाख रुपये इतकी आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदींसह भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.

सध्या वाशी व मसद शिर्की विभागातील जनतेला पाणीटंचाईचा जबरदस्त फटका बसत असून खारेपाटाच्या या दोन्ही बाजंूकडून जनतेच्या तक्रारी व त्याबाबतची निवेदने प्रांतअधिकारी निधी चौधरी यांना दिवसाआड देण्यात येत आहेत. याबाबत शुक्रवारी वाशी विभागातील ६ ग्रामपंचायत सरपंचांनी महासंघ स्थापन करुन राजकारणविरहित एकत्र येवून पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी निवेदन प्रांत अधिकारी निधी चौधरी यांना दिले आहे.

दूषित पाणी व पाणीटंचाई याबाबतची निवेदने वारंवार आमच्याकडे येत असून याबाबतची सर्व माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले याबाबत लवकरच संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी, सरपंच यांची बैठक घेवून अंमलबजावणीचे निर्देश देतील.
- निधी चौधरी, प्रांत तथा महसूल अधिकारी.

Web Title: Hetwah-Shahapada dams to be added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.