जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार हायटेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:45 PM2019-03-08T23:45:12+5:302019-03-08T23:45:20+5:30
महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
अलिबाग : महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. त्याचा फायदा रायगड जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना होणार आहे. हे मोबाइल लवकरच अंगणवाडी सेविकांच्या हातात दिसणार आहेत. त्यामुळे तेथील अंगणवाड्या आणि सेविकांचा कारभार हायटेक होणार आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ८ मार्च ते २२ मार्च या कालावाधीत पोषण अभियान कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३ अतिकुपोषित आणि ७६ कमी प्रमाणात कुपोषित बालके सापडली आहेत. हा आकडा तीन अंकीवरुन दोन अंकावर आला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करण्यात येईल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त
केला.
पोषण आहाराविषयी जनजागृती होऊन बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत महिला बालविकास विभागाच्या वतीने पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
>महिन्याला ५०० रुपयांचा रिचार्ज : जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना मोबाइलचे वाटप करण्यात येणार आहे. एका कंपनीचा आठ हजार ७०० रुपये किमतीच्या मोबाइल आहे. तसेच महिन्याला सरकारकडूनच ५०० रुपयांचा रिचार्ज करुन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कामे करावी लागतात ती सर्व दैनंदिन कामे आता मोबाइलवर करता येणार आहेत. बालकांच्या शारीरिक नोंदी, (उंची, वजन आदी) ही सर्व कामे आॅनलाइन होणार.
>रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवणार पोषण अभियान कार्यक्रम
८ मार्च रोजी पोषण जत्रा, जनजागृतीसाठी पत्रकार परिषद आयोजित करु न माध्यमांना माहिती देणे, शनिवार ९ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर बैठका घेणे, १० रोजी सायकल रॅली,
११ रोजी प्रत्येक शाळा स्तरावर अॅनिमिया चाचणी शिबिरांचे आयोजन, मंगळवारी १२ मार्च रोजी पोषण जनजागृतीसाठी किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती अभियान, बुधवारी १३ रोजी सायकल रॅली, १४ मार्च रोजी युवा गट बैठक व पोषण फेरी, शुक्र वारी किशोरावस्थेतील मुलींसाठी जागृती मोहीम, १६ मार्चला शेतकरी क्लब बैठक, बाजार उपक्र म, १७ रोजी पोषण वॉक, सोमवारी १८ मार्चला युवा वर्ग बैठक व शालेय स्तरावर कार्यक्र म, मंगळवार १९ रोजी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व जनजागृती, २० मार्च रोजी अॅनिमिया शिबिर, गुरु वारी २१ रोजी सायकल रॅली आणि शुक्र वारी २२ मार्चला पंचायत समितीस्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. या शिवाय राज्यस्तरीय नियोजनानुसार, गृहभेटी, एसएचजी मीटिंग्स, मास मीडिया मोहीम, नुक्कड नाटक आणि सामुदायिक रेडिओ, सोशल मीडिया कॅम्पेन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहेत.