शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:45 PM

महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

अलिबाग : महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. त्याचा फायदा रायगड जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना होणार आहे. हे मोबाइल लवकरच अंगणवाडी सेविकांच्या हातात दिसणार आहेत. त्यामुळे तेथील अंगणवाड्या आणि सेविकांचा कारभार हायटेक होणार आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ८ मार्च ते २२ मार्च या कालावाधीत पोषण अभियान कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३ अतिकुपोषित आणि ७६ कमी प्रमाणात कुपोषित बालके सापडली आहेत. हा आकडा तीन अंकीवरुन दोन अंकावर आला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करण्यात येईल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्तकेला.पोषण आहाराविषयी जनजागृती होऊन बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत महिला बालविकास विभागाच्या वतीने पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.>महिन्याला ५०० रुपयांचा रिचार्ज : जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना मोबाइलचे वाटप करण्यात येणार आहे. एका कंपनीचा आठ हजार ७०० रुपये किमतीच्या मोबाइल आहे. तसेच महिन्याला सरकारकडूनच ५०० रुपयांचा रिचार्ज करुन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कामे करावी लागतात ती सर्व दैनंदिन कामे आता मोबाइलवर करता येणार आहेत. बालकांच्या शारीरिक नोंदी, (उंची, वजन आदी) ही सर्व कामे आॅनलाइन होणार.>रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवणार पोषण अभियान कार्यक्रम८ मार्च रोजी पोषण जत्रा, जनजागृतीसाठी पत्रकार परिषद आयोजित करु न माध्यमांना माहिती देणे, शनिवार ९ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर बैठका घेणे, १० रोजी सायकल रॅली,११ रोजी प्रत्येक शाळा स्तरावर अ‍ॅनिमिया चाचणी शिबिरांचे आयोजन, मंगळवारी १२ मार्च रोजी पोषण जनजागृतीसाठी किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती अभियान, बुधवारी १३ रोजी सायकल रॅली, १४ मार्च रोजी युवा गट बैठक व पोषण फेरी, शुक्र वारी किशोरावस्थेतील मुलींसाठी जागृती मोहीम, १६ मार्चला शेतकरी क्लब बैठक, बाजार उपक्र म, १७ रोजी पोषण वॉक, सोमवारी १८ मार्चला युवा वर्ग बैठक व शालेय स्तरावर कार्यक्र म, मंगळवार १९ रोजी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व जनजागृती, २० मार्च रोजी अ‍ॅनिमिया शिबिर, गुरु वारी २१ रोजी सायकल रॅली आणि शुक्र वारी २२ मार्चला पंचायत समितीस्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. या शिवाय राज्यस्तरीय नियोजनानुसार, गृहभेटी, एसएचजी मीटिंग्स, मास मीडिया मोहीम, नुक्कड नाटक आणि सामुदायिक रेडिओ, सोशल मीडिया कॅम्पेन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहेत.