निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन खबरदारी घेत आहेत. जिल्ह्यात सध्या ५२० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरित ७ हजार १३ बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांत रायगड जिल्ह्यात ५७ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधून ५४ हजार ३७१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढत आलेख लक्षात घेऊन ४५ ठिकाणी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अद्याप लस निघालेली नाही. लस येईपर्यंत नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे आत्यावश्यक आहे, तसेच सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, तरच येणारी दुसरी लाट थोपविण्यात आपण यशस्वी होऊ डाॅ.सुहास माने जिल्हा शल्य चिकित्सक