पेण येथे सर्वाधिक पाऊस

By admin | Published: June 28, 2017 03:30 AM2017-06-28T03:30:03+5:302017-06-28T03:30:03+5:30

मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २१२ मि.मी. पावसाची नोंद पेण येथे झाली आहे.

The highest rain at Pen | पेण येथे सर्वाधिक पाऊस

पेण येथे सर्वाधिक पाऊस

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २१२ मि.मी. पावसाची नोंद पेण येथे झाली आहे. पेणमधील या पावसाच्या तडाख्याने पेण तालुक्यातील शिहू गावात एक गुरांचा गोठा कोसळला, तर आमटेम गावात दोन घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
अंबा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, अंबा नदीची धोकादायक पूरपातळी सीमा आठ मीटर असून, मंगळवारी सकाळी ८ वाजता नागोठणे येथील केटी बंधाऱ्याजवळ नदीची पातळी ७.७० मीटर झाली असल्याने नदीकिनाऱ्यांवरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणादेखील सज्ज करण्यात आली असल्याचे पाठक यांनी सांगितले.

Web Title: The highest rain at Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.