शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कोकणात अतिवृष्टीचा इशारा : रायगडला पावसाने झोडपले, भिरा धरणातून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:42 AM

जिल्ह्यात गणेशागमनापासून संततधार पाऊस सुरू असल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी सकाळी ८ वाजता हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने

विशेष प्रतिनिधीअलिबाग : जिल्ह्यात गणेशागमनापासून संततधार पाऊस सुरू असल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी सकाळी ८ वाजता हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती नियंत्रण यंत्रणांनी सर्वत्र सतर्कतेचा इशार दिला आहे. हवामान खात्याने जिल्हा प्रशासनांना कळविलेल्या हवामान अंदाजानुसार, सोमवारी आणि मंगळवारी कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे.रायगड जिल्ह्याच्या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कुंडलिका नदी क्षेत्रात कोलाड येथे ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, डोलवहाळ येथे या नदीची जलपातळी २२.६५ मीटरला पोहोचली आहे. कुंडलिका नदीची संभाव्य धोकादायक पूरपातळी २३.९५ मीटर आहे. अंबा नदी क्षेत्रात उन्हेरे येथे ४० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, नागोठणे येथे नदीची जलपातळी ५.९० मीटरला पोहोचली आहे. अंबा नदीची संभाव्य धोकादायक पूरपातळी ९ मीटर आहे. महाड येथे ३४.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, महाड येथे जलपातळी ४ मीटरला पोहोचली आहे. सावित्री नदीची संभाव्य धोकादायक पूरपातळी ६.५० मीटर आहे. पाताळगंगा नदी क्षेत्रात कलोते-मोकाशी येथे ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, लोहप येथे नदी जलपातळी १९.४० मीटरला पोहोचली आहे. पाताळगंगा नदीची संभाव्य धोकादायक पूरपातळी २१.५२ मीटर आहे. उल्हास नदीच्या क्षेत्रात अवसरे येथे ६१ मि.मी. पावसाची नोंद असून, कर्जत येथे नदी पातळी ४६.१० मीटर झाली आहे. उल्हास नदीची संभाव्य धोकादायक पूरपातळी ४८.७७ मीटर आहे. गाढी नदी क्षेत्रातील पनवेल येथे ६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पनवेल येथे नदी जलपातळी २.८० आहे. संभाव्य धोकादायक पूरपातळी ६.५५ मीटर आहे.उरणकरांना पावसाने झोडपले१उरण : सहा दिवसांपासून कोसळणाºया जोरदार पावसाने उरणकरांना अगदी झोडपून काढले आहे. पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले असून, उरण शहर आणि परिसरातील काही गावांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे.२गणपती आगमनापासून उरण परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. उरण शहरातील वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार ते साठे हॉटेल, एनआय हायस्कूल, गणपती चौक आदी रस्त्यांवर पाणी जमा झाले होते. ग्रामीण भागातील चिरनेर, भेंडखळ, नवघर, करंजा आदी भागांत पावसाचे पाणी गावात शिरले होते. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची चांगलीच पंचायत झाली. ३उरण परिसरात पावसाच्या दमदार एंट्रीने शहर, गावातील नाले, गटारे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तर जोरदार बरसणाºया पावसाने चांगलीच दमछाक केली आहे. विशेषत: रस्त्यांवरील गणेशोत्सव गणेश मंडळाचे मंडप, गणपती त्यांचे देखावे पाहण्यास उत्सुकता असूनही पावसामुळे गणेशभक्तांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.४मुसळधार पावसामुळे जेएनपीटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. आधीच खड्ड्यांमुळे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. त्यात आता मुसळधार कोसळणाºया पावसामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर झाला असून, जेएनपीटी परिसरात वाहतूक मंदावली आहे. पावसामुळे वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे जोरदार पावसामुळे रहिवासी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भातशेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकरी, नागरिक चांगलेच सुखावले आहेत.म्हसळा : तालुक्यात आतापर्यंत तब्बल २७८५.२६ मि.मी. पाऊस झाला आहे. रविवारी ६४.२० सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गणपती सण म्हटला की, भजन, कीर्तन अशा अनेक कार्यक्र मांचे आयोजन केले जाते; परंतु पाऊस असल्याने इनडोर कार्यक्र म करण्याव्यतिरिक्त पर्याय भक्तगणांपुढे उरला नाही. मंडप कोलमडून पडले आहेत, अंगणात संपूर्ण चिखल आहे. मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातून शहराकडे ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. कित्येक गावांमध्ये प्रवासाकरिता एसटी दिवसातून एखादीच असल्यामुळे बहुतेक खासगी वाहने, रिक्षा यांचाच वापर प्रवासाकरिता होतो परंतु खड्ड्यांमुळे आणि पावसामुळे या दुर्गम खेड्यांकडे जाण्यास तयार नाही.