सलग सुट्ट्यांमुळे महामार्ग गजबजला
By admin | Published: December 25, 2015 02:31 AM2015-12-25T02:31:31+5:302015-12-25T02:31:31+5:30
सलग शासकीय सुट्ट्या आणि विकएण्डमुळे कोकण फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दासगाव : सलग शासकीय सुट्ट्या आणि विकएण्डमुळे कोकण फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महामार्गाने कोकणात जाणाऱ्या छोट्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, सध्या दोन दिवस महामार्ग गजबजलेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण कोकणात थंडीच्या लाटा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अचानक वाढलेली थंडी आणि चार दिवसांच्या मिळालेल्या शासकीय सुट्ट्या या संधीचा फायदा उचलत शासकीय कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग व इतर सामान्य नागरिक कोकणात फिरण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण भारतातून कोकण पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावल्याचे वाढत्या महामार्गाच्या वाहतुकीमुळे दिसून येत आहे. कोकणात अनेक पर्यटन स्थळे आहेत. नेहमी जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. राज्यभरातून शैक्षणिक सहलीही येत असल्याने महामार्गावर काही ठिकाणी वाहतूककोंडी झालेली दिसते.