- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या महाड येथील महामार्ग पोलीस केंद्राची चौकी चौपदरीकरणाच्या कामात बाधित होणार आहे. या चौकीला नवीन जागा अद्याप देण्यात आली नसली तरी ही चौकी महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. महाडजवळ असलेल्या दासगाव गावालगत ही चौकी असावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील गांधारपाले येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र (चौकी) आहे. महामार्गावर वाहतूक व्यवस्था पाहणे, आणीबाणीच्या प्रसंगी वाहनचालकांना व प्रवाशांना मदत करणे तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी अशी केंद्र व तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. महाड येथील हे केंद्र ७ मार्च १९८८ सुरू करण्यात आले. आज ३० वर्षांनंतरही या ठिकाणी महामार्ग पोलीस विभागाची स्वतंत्र इमारत नसल्याने कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. केंबुर्ली गावाजवळ असलेली पत्र्याची पोलीस चौकी ही महामार्ग चौपदरीकरण कामात बाधित होत असून महामार्गावर नवीन पोलीस चौकीसाठी जागा मिळणे आवश्यक आहे. महाड पोलीस केंद्राची हद्द ही इंदापूर ते पोलादपूरपर्यंत आहे.
इंदापूर ते पोलादपूर दरम्यान मध्यवर्ती ठिकाणी या चौकीला जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. चौपदरीकरण कामानंतर ही पोलीस चौकी सावित्री पुलानजीक स्थलांतर करण्याची शक्यता आहे. याठिकाणी टोल नाका देखील वसवला जाणार आहे. मात्र महामार्ग पोलीस विभागाचे क्षेत्र पाहता इंदापूर ते पोलादपूर दरम्यान दासगाव हे मध्यवर्ती आणि सर्व सोयीने युक्त असे गाव असल्याने या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी होत आहे.पोलीस निरीक्षकाची तीन पदे रिक्तच्या पोलीस मदत केंंद्रतंर्गत इंदापूर ते पोलादपूर हा महामार्गाचा भाग येतो. या मार्गावर दिवस-रात्र पेट्रोलिंग (गस्त)चे कामही पोलिसांना करावे लागते. यासाठी असलेली जीप नादुरु स्त आहे. या मदतकेंद्रात अॅम्ब्युलन्स व क्रे नही उपलब्ध नाही.च्आवश्यक असणारा कर्मचारी वर्गही याठिकाणी पुरविला जात नसल्याने इतर पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागतो. या केंद्रात पोलीस निरीक्षकाची तीन पदे आहेत. ती सर्व रिक्त आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांची ३० पदे असून या ठिकाणी केवळ ८ कर्मचारीच काम करत आहेत.अपुºया सुविधाच्सध्या महामार्गाशेजारी एका अपुºया जागेत कंटेनर व पत्र्याचा वापर करून तात्पुरती पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. चोवीस तास कार्यरत असलेल्या या मदतकेंद्रात पिण्यासाठी साधे पाणीही उपलब्ध नाही. पावसाळ्यात एका डोंगरातून येणारे पाणी पिंपामध्ये साठवून हे कर्मचारी आपली पाण्याची गरज भागवतात तर उन्हाळ्यात कॅन आणले जातात. छत पत्र्याचे असल्याने कडक उन्हाळ्यात ते तापते व घामाच्या धारा पुसत पोलिसांना काम करावे लागते. यातच बाजूला जेवणाची व निवासाची तात्पुरती सोय आहे. तीस वर्षांनंतरही या कर्मचाºयांना कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यासाठी यंत्रणेला वेळ मिळालेला नाही.
कर्मचारी कमतरता व अन्य बाबींबाबत वरिष्ठ पातळीवर कळवले जात असते तेथूनच याकरिता पाठपुरावा सुरू आहे.- सचिन गवळी, निरीक्षक महामार्ग पोलीस