शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महाडजवळील महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी हलवणार,चांढवे गावहद्दीत नवीन चौकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:47 PM

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर असणाºया वाहतूक शाखा पोलीस चौक्या अपघातानंतर मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात, वाहतुकीला होणारे अडथळेदेखील नेहमी दूर करत असतात. महाड शहरानजीक असलेली वाहतूक शाखा पोलीस चौकी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानंतर या ठिकाणाहून हलवून तालुक्यातील चांढवे या गावहद्दीत नवीन होणाºया टोल नाक्याजवळ बांधण्यात येणार असल्याची माहिती याच विभागाकडून प्राप्त झाली आहे. जर चांढवे या ठिकाणी ती बांधण्यात आली तर जवळपास ४० किलोमीटर अंतरावर या चौकीचा मदतीसाठी काही उपयोग होणार नाही.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे. महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकीदेखील या ठिकाणाहून उचलून चांढवे गावहद्दीत बांधण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या पोलीस चौकीअंतर्गत इंदापूर ते पोलादपूर असे ५७ किलोमीटरचे अंतर आहे. आजही इंदापूर आणि माणगाव विभागात वाहतूककोंडी किंवा अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महाडवरून वाहतूक शाखा पोलिसांना फार वेळ लागतो. इंदापूरपासून या चौकीचे अंतर जवळपास ४० किलोमीटर इतके आहे. आशा परिस्थितीत जर ही चौकी चांढवे या गावहद्दीत बांधण्यात आली तर या अंतरामध्ये पुन्हा १० किलोमीटरची वाढ होणार आहे. अशावेळी इंदापूर किंवा माणगाव विभागासाठी या चौकीचा काही उपयोग होणार नाही. अपघात प्रसंगी या चौकीपासून कोणतीही मदत लवकर मिळणे अशक्य होणार आहे.या चौकीअंतर्गत महामार्गाचे इंदापूर ते पोलादपूर ५७ किलोमीटर अंतर आहे. पुढील चौकी मध्यवर्ती ठिकाणी आल्यास दोन्हीकडील हद्दीत लक्ष ठेवता येईल.- वाय.एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा, महाडअपघात प्रसंगी उपयोग नाही१महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी जरी नवीन महामार्ग झाला तरी एकतर त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी; नाहीतर इंदापूर आणि पोलादपूर या ५७ किलोमीटर अंतराच्या मध्यभागी बांधण्यात यावी. जेणेकडून अपघात, वाहतूककोंडी किंवा इतर काही अडथळा असो पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तातडीची मदत वाहनचालकांना मिळू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.२२०१९ मध्ये इंदापूर ते पोलादपूरदरम्यान जवळपास १०० हून अधिक अपघात झाले. यामध्ये ९० अपघात हे महाड आणि इंदापूरदरम्यान झाल्याची नोंद आहे. आशा परस्थितीत महाड येथील महामार्ग वाहतूक पोलीस चौकी ही त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी, नाहीतर मध्यभागी म्हणजेच दासगाव किंवा वीर गाव हद्दीमध्ये बांधावी; अथवा ५७ किलोमीटर अंतरामध्ये दुसरी चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडtraffic policeवाहतूक पोलीस