गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:55 PM2020-08-21T23:55:49+5:302020-08-21T23:56:38+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Highway traffic police ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

Next

सिकंदर अनवारे 
दासगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतात. यंदा कोरोनामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. २५ अधिकारी आणि २९९ कर्मचारी तैनात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात नोकरीसाठी गेलेले चाकरमानी आपल्या गावी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध आले असून आपल्या गावी येणाºया चाकरमान्यांनादेखील काही दिवस क्वारंटाइन केले जाणार आहे. अशा परस्थितीतदेखील कोकणात चाकरमान्यांनी येण्यास सुरुवात केली असल्याने यांना प्रवासामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत जवळपास ५५० किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरामध्ये महामार्ग वाहतूक शाखेच्या पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबे आणि कसाल अशा सात चौक्या आहेत. या ठिकाणी सध्या ५ अधिकारी आणि १९९ कर्मचारी काम करत आहेत. दरवर्षी गणपती सणासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पर्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे गावामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. लॉकडॉऊनमुळे हे काम बंद होते. त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत कोकणात जाणाºया चाकरमान्यांना प्रवासात कोणतेही त्रास होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. मात्र यंदा बाहेरून या बंदोबस्तासाठी २० अधिकारी आणि १०० कर्मचारी अधिक मागवण्यात आले आहेत. त्यामुळे सात चौक्यांवर असलेल्या ५ अधिकाºयांमध्ये वाढ होत २५ अधिकारी झाले असून कर्मचाºयांमध्येदेखील १०० ने वाढ झाली आहे. यामुळे कर्मचाºयांची संख्या २९९ झाली आहे. हा बंदोबस्त बुधवारपासून सुरू झाला असून २ सप्टेंबरपर्यंत महामार्गावर तैनात राहणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.
>सहा ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात
महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी आलेल्या नियोजनाप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. या शाखेची हद्द ६० किलोमीटर एवढी आहे. १ अधिकारी आणि ५ कर्मचारी कामकाज पाहत असल्याने एवढी मोठी हद्द सांभाळणे अवघड होते. त्यामुळे या शाखेत गणपती सणासाठी १ अधिकारी आणि २२ कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. या शाखेमध्ये आता २ अधिकारी आणि २७ कर्मचारी झाल्यामुळे चाकरमान्यांना या हद्दीमध्ये कोणतीच अडचण निर्माण होणार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी सांगितले आहे. या हद्दीमध्ये माणगाव, लोणारे, नातेखिंड, महाड एसटी डेपोसमोर, राजेवाडी फाटा आणि पोलादपूर असे सहा पॉइंट तयार करण्यात आले असून या ठिकाणी सतत पोलीस तैनात राहणार आहेत. मोबाइल व्हॅन मोटार बाइक पोलीस सतत गस्त घालणार आहेत. काही अडचण निर्माण झाल्यास जे.सी.बी., रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या असून दोन पॉइंटवर सीसीटीव्हीची नजरदेखील राहणार आहे.

Web Title: Highway traffic police ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.