महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:12 PM2018-08-20T23:12:07+5:302018-08-20T23:12:33+5:30

वडखळ, खोपोली, माणगाव वाहतूककोंडीची प्रमुख ठिकाणे

Highway will be headaches this time; Travel to the Ganesh Festival | महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

Next

- सिकंदर अनवारे 

दासगाव : दरवर्षी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात वाहन चालकांना डोकेदुखी बनतो. यंदा देखील महामार्गाची दैना झाली असून या मार्गाने प्रवास करणे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणानंतर पळस्पे ते इंदापूर दरम्याच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तीच अवस्था दुसऱ्या टप्प्यातील पाली आणि खोपोली मार्गाच्या रुंदीकरणामुळे झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास अडचणीतून होणार असून त्यासाठी तासन्तास मोठी कसरत करावी लागणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पळस्पे ते इंदापूर रखडल्यानंतर गेली सहा वर्षे या मार्गावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के वाहनचालकांनी पनवेल ते कोकण मार्ग बंद करत पनवेल द्रुतगती मार्गाने खोपोली-पाली-वाकण असा मार्ग अवलंबला होता. मात्र त्याही मार्गाचे यंदा रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. आता चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे इंदापूरपासून चिपळूणपर्यंत काम सुरू झाले आहे. या दुसºया टप्प्याच्या अर्धवट कामामुळे चालकांसह प्रवासीही त्रस्त असून कशेडी घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. पनवेल ते चिपळूण असा सध्याचा प्रवास मोठा कसरतीचा आणि अडचणीचा झाला आहे. सध्या पनवेल ते महाड २ तासाच्या प्रवासाला तब्बल पाच ते सहा तास लागत आहेत. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कोकणात जाणाºया प्रवाशांसाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सोयीचा आहे. दरवर्षी याच मार्गावर गणपती सणामध्ये मोठ्या रांगा लागतात. दुसरा मार्ग कोकणात जाण्यासाठी असला तरी या मार्गापेक्षा जवळपास १०० किमी अंतराचा फरक पडतो. यंदा पनवेल ते इंदापूर महामार्गावरील खड्डे, पाली- खोपोली मार्गाचे रुंदीकरण आणि दुसºया टप्प्याचे रुंदीकरण या तिन्ही अडचणींना चाकरमान्यांना सामोरे जावे लागणार आहे. शासनाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचा दावा केला जात असला तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसात उखडून जात आहेत.

कशेडी घाटाची भीती कायम
यंदा पावसाचा जोर जास्त आहे. कशेडी घाटातील काही भाग खचला असून अतिवृष्टी झाल्यास घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात येतो.
घाट बंद पडल्यानंतर याला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर विन्हेरे महाड असा मार्ग आहे. मात्र त्याही मार्गावर एक दोन ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून हा मार्ग अरुंद अवस्थेत आहे.

माणगाव आणि वडखळ आजही वाहतुकीस डोकेदुखी
मुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते महाड अंतरापर्यंत जवळपास दोन ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. वडखळ आणि माणगाव पेण ते वडखळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
या ठिकाणाहून अलिबाग आणि कोकणातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात अलिबागकडे जाणारी असतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे अवजड वाहनांची गती कमी होते आणि या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.
त्यामुळे या दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन-दोन तीन-तीन तास लागतात. मात्र गणपती सणामध्ये हजारो वाहनांची संख्या असल्याने या ठिकाणी चांगलीच कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यानंतर मधला टप्पा खुला असला तरी पुन्हा माणगाव या ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सण असो किंवा इतर वेळी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असो या ठिकाणचा वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Web Title: Highway will be headaches this time; Travel to the Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.