महामार्ग होणार खड्डेमुक्त; मुदतपूर्व काम पूर्णत्वास येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 12:40 AM2019-03-10T00:40:38+5:302019-03-10T00:40:50+5:30

पुलावर सिमेंटीकरणाचे काम युद्धपातळीवर

Highways will be free of pits; Full-time work will be completed | महामार्ग होणार खड्डेमुक्त; मुदतपूर्व काम पूर्णत्वास येणार

महामार्ग होणार खड्डेमुक्त; मुदतपूर्व काम पूर्णत्वास येणार

googlenewsNext

कळंबोली : पनवेल-सायन महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, १८ महिन्यांची मुदत असलेले हे काम नऊ महिन्यांतच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराला देण्यात आले आहे. खड्डेप्रवण क्षेत्रात काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे यंदा खड्ड्यांच्या अडथळ्याविना महामार्गावरून प्रवास करता येणार आहे.

सायन-पनवेल महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले होते. गेल्या वर्षी पावसाळ्यात महामार्गाची चाळण झाली होती. तसेच सर्व्हिस रोडची अवस्थाही बिकट झाल्याने वाहनांच्या रांगा रोजच्याच झाल्या होत्या. याबाबत विधानसभेत आवाज उठवण्यात आल्यावर मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना लक्ष टाकावे लागले. सर्वात आधी तळोजा-लिंकरोडलगत असलेल्या मार्गिकेचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्याचबरोबर पुलावरही काँक्रीटीकरण करण्यात आले असून कोपरा, कळंबोली, कामोठे, बेलापूर पुलावर हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या पुलावर सिंमेटीकरण
कळंबोली—कामोठे- तळोजा लिंक रोडवरील पूल, कोपरा- खारघर-बेलापूर- शिरवणे- तुर्भे, सानपाडा- जुईनगर- वाशी भुयारी मार्ग- वाशी गाव- सीएमसीआर जंक्शन ङ्क्त बीएआरसी पुलाखाली रस्ता याशिवाय कळंबोली, वाशी गाव येथील दोन ठिकाणचे सर्व्हिस रोडचे काम

सायन-पनवेल महामार्गावरील पुलाचे सिंमेटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याची मुदत नऊ महिन्यांची असली तरी संबंधित ठेकेदाराला नऊ महिन्यांत म्हणजे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ही कामे दोन ठेकेदारांना विभागून दिली गेली आहेत.
- रवींद्र पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : काँक्र ीटीकरणाच्या कामाला ७८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेलकॉन व टीआयपीएल कंपनीला हे काम पूर्ण करण्याकरिता दीड वर्षाची मुदत देण्यात आली आहे; परंतु एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे नऊ महिन्यात हे काम पूर्ण करून देण्याच्या सूचना या विभागाच्या सचिवांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.

Web Title: Highways will be free of pits; Full-time work will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.