पनवेलमधील ऐतिहासिक तोफांना नवीन झळाळी; पालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात

By वैभव गायकर | Published: March 12, 2024 03:28 PM2024-03-12T15:28:11+5:302024-03-12T15:28:20+5:30

या तोफांना नवे लूक प्राप्त होणार आहे.याकरिता गड किल्ल्याचे अभ्यासक व पुरातत्वज्ञ सागर मुंढे,भाग्यश्री मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफांचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे

Historic cannons in Panvel get a new look; Work started through the Panvel municipality | पनवेलमधील ऐतिहासिक तोफांना नवीन झळाळी; पालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात

पनवेलमधील ऐतिहासिक तोफांना नवीन झळाळी; पालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात

पनवेल:पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या ऐतिहासिक तोफांचे नवीन झळाळी मिळणार आहे. या आठ तोफाचें तंत्रशुद्ध पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असुन आठवडाभरात हे काम पुर्ण होणार आहे.      

पनवेल मधील ऐतिहासिक बंदरात या तोफा ठेवलेल्या होत्या.त्यानंतर काही इतिहास संशोधकांनी त्यांचा शोध लावल्यानंतर या शिवकालीन तोफांचे मानाचे स्थान म्हणुन पनवेल नगरपरिषदेच्या मुख्य ईमारतीत ठेवण्यात आले.कालांतराने पालिका स्थापन झाली असली तरी तोफांचे स्थान कायम ठेवण्यात आले.मात्र शेकडो वर्षाच्या या तोफांना गंज चढल्याने या तोफांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांची सल्लामसलत करून आयुक्त गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ,उपायुक्त पवार यांनी याबाबत या तोफांना नवीन झळाळी देण्याचे काम हाती घेतले.यापूर्वी या तोफांची  दोन वर्षांपूर्वी रासायनिक प्रक्रिया पूर्ण केली होती.

या तोफांना नवे लूक प्राप्त होणार आहे.याकरिता गड किल्ल्याचे अभ्यासक व पुरातत्वज्ञ सागर मुंढे,भाग्यश्री मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफांचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.पुरातत्व चे विद्यार्थ्यांना संधी म्हणून या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे .या मध्ये मुंबई विद्यपीठातील पुरातत्व विषयाचे मास्टर्स चे विद्यार्थी निकुंज मांढरे,मधुरा सावंत,मयुरी पवार,रसपाल सिंग रंधावा या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप म्हणून सहभाग घेतला.सदर तोफांचे जतन आणि संवर्धन कार्य पुढील आठ ते नऊ दिवस चालू राहील त्या नंतर तोफांना पारंपरिक लाकडी तोफगाडे बसविण्यात येणार असल्याचे सागर मुंढे यांनी सांगितले.लवकरच पनवेल महानगरपालिका परिसरातील तोफा लाकडी तोफगाड्यावर बसविण्यात येणार असून त्याचे ऐतिहासिक महत्व वाढणार असल्याचे  सागर मुंढे यांनी सांगितले.  प्रतिक्रिया - ऐतिहासिक वारसा जतन करणे हे

Web Title: Historic cannons in Panvel get a new look; Work started through the Panvel municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.