शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:23 AM

नवी मुंबईत कचºयाचे ढिगारे : प्रशासनाचे २० दिवसांत प्रलंबित थकबाकी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वारंवार निवेदन देऊनही किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळत नसल्यामुळे कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यामुळे सायंकाळपर्यंत शहरात कचºयाचे ढिगारे पाहावयास मिळत होते. प्रशासनाने २० दिवसांत प्रलंबित थकबाकी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ६,२०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. कामगार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कामगारांसाठी किमान वेतन लागू करण्यात आले. कामगारांना फरकाची रक्कमही देण्यात आली, परंतु कचरा वाहतूक करणाºया कामगारांना किमान वेतन व फरकाची रक्कम मिळाली नव्हती. समाज समता कामगार संघटनेने पाच दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाने सर्व लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. ठेकेदाराला तसे आदेशही दिले होते, परंतु ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही दोन महिन्यांत कामगारांना फरकाची रक्कम देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. ४३ महिन्यांची थकबाकी मिळणे अपेक्षित असताना फक्त १३ महिन्यांची थकबाकी मिळाली होती. उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता, परंतु प्रश्न सुटत नसल्यामुळे २१ सप्टेंबरला एक दिवसाच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. कचरा वाहतूक कर्मचाºयांनी आंदोलन केल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात कचºयाचे ढिगारे कायम होते. या आंदोलनाची त्वरित दखल प्रशासनाने घेतली. घनकचरा विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पुढील २० दिवसांत कामगारांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर, आंदोलन मागे घेतले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर, सरचिटणीस मंगेश लाड आदी उपस्थित होते.

सायंकाळी कचरा उचलण्यास सुरुवातकामगारांनी आंदोलन केल्यामुळे शहरात कचºयाचे ढीग तयार झाले होते. मनपा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले व सायंकाळी तत्काळ कचरा उचलण्यास सुरुवात केली. उशिरापर्यंत काम सुरू होते.कचरा वाहतूक कर्मचाºयांना त्यांच्या हक्काची थकबाकी मिळावी, यासाठी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करण्यात येत होता, परंतु प्रश्न सुटत नसल्यामुळे एका दिवसाचे आंदोलन करावे लागले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.- मंगेश लाड, सरचिटणीस,समाज समता कामगार संघ