वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:02 AM2018-09-29T05:02:03+5:302018-09-29T05:02:17+5:30

अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे.

 Homeless conduct of the hostel by the hostel | वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

googlenewsNext

- जयंत धुळप
अलिबाग : अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे. याबाबतीत आपण शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात इ. ८ वीपासून पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी राहत आहेत. वसतिगृहात २०१४ पासून महिला गृहपाल एम. जे. नरहरे कार्यरत आहेत. गृहपाल वसतिगृहात मनमानी करतात. त्यामुळे आम्हाला अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या त्रासाला कंटाळून वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपणास निवेदन देत असल्याचे यात नमूद केले आहे.
वसतिगृहातील सुमारे ४० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता पोहोचले असता जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मुलांचे म्हणणे आणि तक्रारी जाणून घेतल्या आणि शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मुलांना दिला.
२०१५ मध्ये योगेश काष्टे हा विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना मोबाइलवर काम करीत होता. यावेळी नरहरे यांनी रूममध्ये येऊन त्याला मारहाण केली. त्याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस केस करण्याची धमकी देऊन, नरहरेंनी त्याला वसतिगृहातून काढले. १ आॅगस्ट २०१८ रोजी करण काष्टे या विद्यार्थ्यास नरहरे यांनी रूममध्ये झाडू मारण्यास सांगितला. विद्यार्थ्याने झाडू कुठे आहे, याबाबत विचारणा केली असता त्यालाही दमदाटी करीत वसतिगृहातून बाहेर काढले.
विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास शिवीगाळ
२९ आॅगस्ट २०१८ रोजी काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता अर्ज देऊन घरी गेले. मात्र, दुसºया दिवशी नरहरे यांनी त्यांना आॅफिसमध्ये बोलावून दमदाटी करून वसतिगृह सोडून जाण्यास सांगितले. विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यांच्यावर अपशब्दांचा भडिमार होतो. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा, पालकांचाही उद्धार करून सतत अपमानित केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पुरुष गृहपाल द्यावे, अन्यथा उपोषण करणार

सतत शारीरिक, मानसिक छळ, दमदाटी, शिवीगाळ, पालकांचा अपमान, मारहाणीचे प्रकार घडत असल्याने वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी त्रासले आहेत. या गोष्टींची लेखी तक्रार वेळोवेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. हे वसतिगृह मुलांचे असल्याने याठिकाणी पुरुष गृहपाल नेमण्यात यावा, नरहरे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा वसतिगृहातील सर्व ६० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवसांनंतर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर ४० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  Homeless conduct of the hostel by the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.