बापू बैलकर -
माथेरान : माथेरानमध्ये एका पर्यटकाचा नुकताच घाेड्यावरून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना काही पहिलीच नाही. यापूर्वीही वारंवार असे अपघात झाले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता घोडेमालकांच्या चुका आहेतच, शिवाय पर्यटकांची बेफिकिरीही तेवढीच आहे, तसेच माथेरानमध्ये असलेल्या जुन्या कायद्यात बदल होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.
अपघाताची कारणे काय? अश्वचालक नवखे व अप्रशिक्षित घोडेस्वारी करताना हेल्मेटघातले जात नाही पर्यटकांच्या मागणीनुसार घोडा पळविला जातो घोडेस्वारी सुरू असताना अश्व चालकाला छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढण्याचा आग्रह
पोलिस सुरक्षा हवीमाथेरानमध्ये दिवस-रात्र पर्यटक फिरत असतात. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. मात्र, त्या तुलनेत सुरक्षा अपुरी असते. अनेकदा पोलिस महत्त्वाच्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे पोलिस सुरक्षा असल्याने घोडेमालकांसह पर्यटकही बेफिकिरीने वागणार नाहीत, अशी मागणी माथेरानकरांनी केली आहे.
जुनी नियमावली बदलणे गरजेचेमाथेरानमध्ये सध्या ‘माथेरान होस्ट १९५९’ नुसार नियमावली लागू आहे. मात्र, काळानुसार ही नियमावली अपुरी पडत आहे. यासाठी आम्ही जिल्हा पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून यात बदल करणे गरजेचे असल्याचे कळविणार आहोत, असे माथेरानचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कडक नियमावलींची गरज आहे. आता आमच्या हातात फक्त सूचना करणे एवढेच असून ते आम्ही करीत आहोत.
अपघातांची मालिका -१९९७ - घोडा उधळल्यामुळे लुईझा पॉइंटवरून पडून घोड्यासह परदेशी महिलेचा मृत्यू २००० - सिनेनिर्माते आचार्यांचा घोड्यावरून पडून मृत्यू२०१५ - इंडिया मेह्यू या परदेशी महिलेचा घोडेस्वारी करताना घोड्याच्या पायाखाली येऊन मृत्यू २०१६ - नीलमसिंग या पर्यटक महिलेचा घोड्यावरून पडून मृत्यू२०१८ - ग्रँट रोड येथील रशीदा रेडिओवाला या महिलेस गंभीर दुखापत२०२३ - घोडा उधळल्यामुळे मोहम्मद शेख यांचा मृत्यू
नगरपालिकेने पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवल्याने घोड्यांचे पाय घसरून अपघात वाढले आहेत. पर्यायी रस्ते देण्याची मागणी केली आहे. आमचे घोडे चालक हे प्रशिक्षित आहेत. -आशा कदम, अध्यक्ष, अश्व पालक संघटना