श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:15 AM2019-05-27T00:15:41+5:302019-05-27T00:15:48+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

Hospice crowd of tourists on Shrivardhan beach | श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली. अखेरच्या पर्यटन हंगामात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ पाडली. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाºया लाटा यामुळे श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत.
मे महिन्यात खास पर्यटनाची चाहूल लागते. या शनिवार, रविवारी महिन्यातील पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी दिवेआगर समुद्रकिनाºयावर दिसून आली. निवडणुकीचे कामकाज आटपून अधिकारी, शाळेची सुट्टी संपत आल्याने आपल्या मित्रमंडळीसह व आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला आले होते. पुणे, मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाºयांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत.
श्रीवर्धनमधील सुमद्रकिनाºयांवर चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पहावयास मिळते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
>मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, पर्यटकांमध्ये नाराजी
पेण : मुंबई-गोवा महार्गावरून कोकणातील निसर्ग सोंैदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी वाहतूककोंडीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्रकिनाºयाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी पेण ते वडखळ मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी पुलाचे तर काही ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाºया गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी पूल, वडखळ नाका येथे दररोज वाहतूककोंडी होत असते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे लहान मुलांसह कटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले असता भरउन्हात वाहतूककोंडीत अडकले. वडखळ ते पेण मार्ग, माणगाव, लोणेरे, महाड येथे दर शनिवार-रविवारी हे चित्र पाहावयास मिळते. वडखळ ते पेण हे ६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असतो.
>रोजगार वाढला
पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकांची ही रेलचेल पावसाळ्यापर्यंत अशीच कायम राहणार आहे.

Web Title: Hospice crowd of tourists on Shrivardhan beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.