हॉटेल व्यावसायिक आनंदी, खवय्यांच्या तोंडाला आली चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:08 AM2020-10-06T00:08:08+5:302020-10-06T00:08:16+5:30

रेस्टॉरंट सुरू; कोरोनाच्या नियमांचे पालन बंधनकारक

The hoteliers were happy, the taste came to the mouths of the eater | हॉटेल व्यावसायिक आनंदी, खवय्यांच्या तोंडाला आली चव

हॉटेल व्यावसायिक आनंदी, खवय्यांच्या तोंडाला आली चव

Next

- आविष्कार देसाई 

रायगड : जिल्ह्यातील निर्सगसाौंदर्यांची भुरळ सर्वांनाच पडते. पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने, या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट यांचे जाळे चांगलेच विस्तारलेले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय ठप्प झाल्याने, सुमारे १,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अटीशर्तींवर हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. खवय्यांनीही हॉटेलकडे मोर्चा वळविला आहे. त्यांच्याही जिभेला चव आल्याने तेही आनंदी असल्याचे दिसून आले.

रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली असली, तरी हॉटेल इंडस्ट्रीला पूर्वपदावर येण्यासाठी किमान सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

घेतली जाणारी दक्षता : हॉटेलमध्ये काम करणारे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी मास्क बंधणकारक आहे. खवय्यांनी खाताना फक्त मास्क काढायचा आहे. सॅनीटायझर वापर आवश्यक केला आहे.

सामाजिक अंतर पाळणे, हॉटेलमध्ये स्वच्छता राखणे, सरकार, प्रशासनाकडून वेळोवेळी येणाºया नियमांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.

स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधने
मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, प्रवेशासाठी दोन मार्ग, कॅशलेस व्यवहार करणे, आरोग्य विभागाला माहिती देणे, एसीचा वापर टाळणे, सातत्याने निर्जंतुकीकरण करणे, भांडी, प्लेट्स, चमचे, वाट्या जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरट बंद होती. आता सुरू झाले आहेत. घरचं खाऊन कंटाळा आला होता. आता हॉटेलमधील पदार्थांची टव चाखता आल्याने समाधान आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात सजगता आहे.
-जितेंद्र पाटील
ग्राहक

कोरोनाचे नियम ठरवून सरकारने हॉटेल व्यवसायाला परवानगी दिले, हे चांगले झाले आहे. व्यवहार ठप्प होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक तोटा सहन कारावा लागला आहे. आर्थिक घडी बसण्यासाठी अजून सहा -आठ महिने लागू शकतात.
- यशवंत हरेर
हॉटेल व्यावसायिक

दर बदलले का?
दरपत्रकामध्ये बदल झालेला नाही. मेनू कार्डही बदलेले नाही. आधी जे दर आणि मेनू होता, तेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, नॉनव्हेजमध्ये मटणाचे दर वाढले आहेत. त्यामुळे त्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. फिश, चिकनचे दर पूर्वी प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

Web Title: The hoteliers were happy, the taste came to the mouths of the eater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.