घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मयूरेश प्रथम, महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:14 AM2017-09-01T01:14:00+5:302017-09-01T01:14:04+5:30
नेरळ ग्रामपंचायत आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नेरळ पाडा येथील मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्र मांक पटकावला असून, गणेशमूर्ती स्पर्धेत प्रभंजन गायकवाड यांनी प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे.
नेरळ : नेरळ ग्रामपंचायत आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नेरळ पाडा येथील मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्र मांक पटकावला असून, गणेशमूर्ती स्पर्धेत प्रभंजन गायकवाड यांनी प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. नेरळ कुंभार आळी येथील महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार ठरले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्र म व कला-क्रीडा प्रदर्शनात अग्रेसर असलेल्या नेरळ शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने यंदा देखील घरगुती गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण नेरळ शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शंभराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
घरगुती गणेश सजावट
स्पर्धेत मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचा महाराजांना झालेला साक्षात्कार व दुष्ट शक्तींचे निर्दालन करण्यासाठी दिलेली भवानी तलवार असा उत्कृष्ट देखावा मयूरेश यांच्या मखर सजावटीमध्ये साकारण्यात आला होता. गणेश सजावट स्पर्धेतील द्वितीय क्र मांक भास्कर निरगुडा, तृतीय क्र मांक लक्ष्मण पारधी, उत्तेजनार्थ ओंकार मनवे यांनी प्राप्त केला.
उत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत योगेश मारु ती मोरे याने द्वितीय क्र मांक ओंकार चंचे याने प्राप्त केला. कचरू बदे
यांना उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट मूर्तिकार स्पर्धेत योगेश मारु ती मोरे याने द्वितीय क्र मांक, मनोहर मोडक याने तृतीय क्र मांक प्राप्त केला.
उत्कृष्ट मूर्तिकाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिलिंद दहिवलीकर यांनी प्राप्त केले. यंदा थर्माकोलपेक्षा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून मखर बनवण्याकडे कल होता. नेरळ टेप आळी येथील तरुण मूर्तिकार योगेश मोरे याने पर्यावरण संवर्धन या संकल्पनेवर आधारित मूर्ती साकारली होती, तर बल्लाळ जोशी यांनी स्वत: कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली होती.