सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:06 AM2018-05-16T03:06:01+5:302018-05-16T03:06:01+5:30

पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे.

House-to-house water scheme without self funding | सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

googlenewsNext

अलिबाग : पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. समाजहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एखादा तरु ण पुढाकार घेतो, वेळप्रसंगी कर्ज काढून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे राहते. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुनील बुरुमकर यांनी हे शक्य करून दाखवले आहे.
शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने घरोघर नळाने पाणीपुरवठा योजना राबविणारे परहूरपाडा गाव राज्यातील पहिले आदर्शवत गाव आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी केले.
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने परहूरपाडा गावातील घरोघर नळाने पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सेवाशक्ती पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कवळे, जाखमाता पतसंस्थेचे चेअरमन जे. पी. घरत, परहूरपाडा पाणीपुरवठा समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुधीर नाईक, आशा नाईक आदी उपस्थित होते.
बुरुमकर यांनी पुढाकार घेऊन ३३० घरांना घरपोच नळपाणी योजना केवळ १३ लाख २५ हजार रुपये खर्चामध्ये राबविली. यासाठी आठ लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी आणि उर्वरित पाच लाख रु पये स्वत: कर्ज काढून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या एकीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही योजना पाणीटंचाईवर मात करीत संजीवनी ठरली असून, आनंदाची झुळूक देणारी योजना आहे. शासकीय योजना लोकसहभागाच्या अभावामुळे कुचकामी ठरत असताना परहूरपाडा ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता ती पूर्ण केली. सर्व ग्रामस्थांना बरोबर घेत १०० टक्के लोकसहभागातून राबविलेल्या या योजनेचा अभ्यास इतर गावांनीही करण्यासारखा असल्याचेही सांगितले.
योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार
ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश पाटील म्हणाले, सुनील बुरुमकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार घेतल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा समितीने कोणतीही राजकीय मदत न घेता केलेले काम आदर्शवत आहे.
महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला
महिला ग्रामस्थ वैष्णवी खोपकर म्हणाल्या, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून ग्रामस्थांनी एकप्रकारे महिलांचा सन्मानच केला आहे. गावासाठी प्रत्येकाला काहीतरी करण्याची ऊर्मी असते; परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. परहूरपाड्यामध्ये सुनील बुरु मकर यांनी पुढाकार घेऊन समाजासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.
परहूरपाडा गावात राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनेची माहिती उपस्थितांना दिली. सामाजिक भावना मनाशी बाळगून भावी पिढीमध्ये चांगल्या गोष्टीचा संदेश जावा, या हेतूने पुढाकार घेतला. योजनेसाठी कमी पडणाºया पैशांसाठी ५ लाख रुपये कर्ज काढावे लागले. मात्र, ग्रामस्थ विशेषत: येथील महिलांच्या चेहºयावरील समाधान त्याहून लाखमोलाचे आहे.
- सुनील बुरुमकर, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, परहूरपाडा

Web Title: House-to-house water scheme without self funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.