घरगुती सौरदीप योजना झाली बंद, शेतक-यांच्या घरात अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:02 AM2017-11-20T02:02:57+5:302017-11-20T02:03:01+5:30
म्हसळा : रायगड जिल्ह्यात शेतकरी हा कृषी विभागाचा कणा मानला जातो. मात्र, त्याच शेतक-यांकडे कृषी विभाग पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अरुण जंगम
म्हसळा : रायगड जिल्ह्यात शेतकरी हा कृषी विभागाचा कणा मानला जातो. मात्र, त्याच शेतक-यांकडे कृषी विभाग पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतक-यांना ज्या प्रमाणे शेतीविषयक सल्ला हवा, तसा सल्ला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सौरदीप योजना जिल्ह्यात गेली दहा ते बारा वर्षांपासून सुरू होती. ही जुनी योजना या वर्षी बंद केल्याने शेतकºयांना आपल्या शेतात, घरात अंधारात काम करावे लागत आहे.
कृषी विभागाची जिल्हा परिषद सेंस फंड व जिल्हा नियोजन समितीमार्फत शेतकºयांना घरगुती सौरदीप योजना गेल्या अनेक वर्षांपासून घराघरांत देण्याचे कार्य सुरू केले होते. त्या योजनेने शेतकºयांना शेतात रात्रीचे काम करणे सोईस्कर होत होते. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी वीज भारनियमन होत असल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शासनाच्या विविध योजना येतात आणि जातात; परंतु ही योजना शेतकºयांना पूरक होती. सामान्यातील सामान्य शेतकरी या योजनेचा पुरेपूर लाभ घेत होता. मात्र, असे असताना या योजनेला बाजूला ठेवून ज्या योजना शेतकºयांना उपयुक्त नाहीत, त्या योजना सुरू ठेवल्या आहेत. मात्र, ज्या योजना गरजेच्या आहेत त्या कोणत्या कारणामुळे बंद केल्या? असा प्रश्न रायगड शेतकरी करीत आहेत. पंचायत समितीमधील ‘कृषी विभाग’ शेतकºयांसाठी असणाºया योजना शेतकºयांना जरी लाभदायक असल्या तरी त्या योजना गावागावांत, खेड्या-वस्तीमध्ये पोहोचत नसल्याचा आरोप अनेक शेतकरी करीत आहेत.
शासन आपल्या दारी केवळ कागदावरच दिसत आहे. सौरदीप योजनने विषयी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्याकडे संपर्क साधला असता, पनवेल महानगरपालिका झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे ५७ कोटींचे बजेट कमी झाले आहे; परंतु शेतक ºयांना अत्यावश्यक साधन-सुविधा देण्याचे काम करणार आहे. कृषी विभागाशी बोलून सौरदीप योजना सुरू करू.
>शेतकºयांना गरजेच्या योजना देणे हे आमचे कर्तव्य आहे. डी.बी.टी. (प्रत्यक्ष लाभ) योजना निर्माण झाल्यापासून शेतकºयांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्ह्यातून नावीन्यपूर्ण बाबीसाठी ३५०० अर्ज आले; परंतु अनुदान अल्प असल्यामुळे शेतकºयांना सर्वच योजना देता येत नाहीत, याची खंत आहे. आम्ही तीन लाख रु पयांचे भात बियाणे विक्र ीसाठी ठेवले; पण डी.बी.टी. योजनेमुळे एक किलोही बियाणे कोणी खरेदी केले नाही. त्यामुळे सौरदीप संच योजनेमध्येही हाच प्रकार होण्याची भीती निर्माण होत आहे. तरीही शेतकºयांच्या मागण्यांनुसार ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल.
- डी. बी. पाटील, कृषी सभापती,
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग
>या वर्षातील तरतुदींमुळे काही योजना आर्थिक बाबींमुळे मागे पडल्यात कारण या वर्षी बजेट कमी झाले आहे; परंतु कृषी विभागामार्फत कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात, ते पाहून त्या योजनेमध्ये सौरदीप योजना असेल आणि या वर्षी ही योजना घेतली नसेल, तर आम्ही प्राधान्यक्र म देऊन ही सौरदीप योजना यावर्षीही घेण्यासाठी प्रयत्न करू.
- अदिती तटकरे,
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा
>आमच्या म्हसळा तालुक्यात सौरदीप संच योजना गेली अनेक वर्षे सुरू होती; परंतु या वर्षी ही योजना बंद केल्याने आम्हा शेतकºयांचे नुकसान झाले आहे. वीज भारनियमन सातत्याने होत असल्यामुळे ही योजना आम्हाला वरदान देणारी आहे, त्यामुळे ही योजना या वर्षीदेखील सुरू करावी.
- दामाजी रामचंद्र पवार, शेतकरी, केलटे
शेतकºयांच्या मागणीनुसार सौरदीप संच योजना सुरू केली जाईल.
- डी.पी.वरपे, कृषी विकास अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग