श्रीवर्धन : हरवलेल्या श्रीवर्धनच्या आजींना डोंबिवलीतल्या दोघांनी सुखरूप घरी सोडले. वार्धक्यात माणुसकीने आधार दिल्याने सुलोचना घाटे आजी डोंबिवलीतल्या मुलाच्या घरी सुखरूप पोहोचल्या. ही घटना सोमवारी घडली.सोमवारी डोंबिवली येथील मानपाड्याच्या शनी मंदिराजवळ राहणाऱ्या सुहासिनी राणे यांना सुलोचना घाटे आजी भेटल्या. आजींचे वय ७५च्या आसपास आहे. त्यामुळे वार्धक्याचा ज्ञानेंद्रियावर काही प्रमाणात परिणाम जाणवणे साहजिकच होते. आजींना स्वत:चे नाव व मूळ गाव श्रीवर्धन हेही आठवत होते, परंतु आपण आता डोंबिवलीतच राहतो, हेच आठवत नव्हते. वास्तवाची जाणीव नसल्याने कठीण समयी काय करावे म्हणून सुहासिनी राणे यांनी पोलीसमित्र अभिषेक परब यांना सांगितले. राणे यांनी त्यांना आपल्या घरी नेले. त्यांची विचारणा करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजींचे माहेर श्रीवर्धन असल्याने त्यांनी तिकडचा पत्ता सांगितला. सोशल मीडियावर आजीबार्इंचा फोटो व श्रीवर्धनचा पत्ता पोस्ट केला गेला. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजीचा मुलगा विलास घाटे यांचा शोध घेण्यात अभिषेक परब यांना यश मिळाले.>मी व माझी बहीण सुहासिनी राणे अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहोत. मी पोलीस मित्र संघटनेचा सभासद आहे. सुलोचना घाटे आजी यांना त्याच्या राहत्या घरी व्यवस्थितपणे पाठवले याचा आनंद आहे. समाजकार्य हे मी माझे नैतिक कर्तव्य मानतो.- अभिषेक परब, समाजसेवक डोंबिवली
वार्धक्याला माणुसकीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:34 AM