पंचायत राज समितीसाठी कोट्यवधींच्या पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:31 PM2018-10-23T23:31:31+5:302018-10-23T23:31:37+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजावरील ५२ लेखाआक्षेपांची झाडाझडती घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने फक्त दोनच तासांत बैठक गुंडाळली.

Hundreds of billions of panchayats for Panchayat Raj Committee | पंचायत राज समितीसाठी कोट्यवधींच्या पायघड्या

पंचायत राज समितीसाठी कोट्यवधींच्या पायघड्या

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजावरील ५२ लेखाआक्षेपांची झाडाझडती घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने फक्त दोनच तासांत बैठक गुंडाळली. पंचायत राज समिती जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे. या कालावधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रांना समिती भेट देण्याची शक्यता आहे. समितीकडून झुकते माप मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पंचायत राज समितीच्या खुशामतीत ‘कोट्यवधींच्या’ पायघड्या घातल्याचे चित्र आहे.
पंचायत राज समिती म्हटले की, प्रशासनासह सत्ताधाºयांच्या उरात चांगलीच धडकी भरते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच संबंधित जिल्हा परिषदेचा फंड या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. विकासकामे करताना काही गैरव्यवहार, भ्रष्टाचार होणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. जिल्हा परिषदांचा कारभार सुरळीत सुुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी राज्य सरकार समिती नेमते. अशा विविध २२ समित्या कार्यरत आहेत. त्यातील पंचायत राज समिती ही तितकीच महत्त्वाची समिती आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे आहेत. त्यांच्या सोबत २७ सदस्य आणि तेवढेच अधिकारी, कर्मचारी आले आहेत.
>लेखापालांकडून ५२ मुद्द्यांवर आक्षेप
रायगड जिल्हा परिषदेने २०१३-१४ या कालावधीत केलेल्या कारभाराबाबत तब्बल ५२ मुद्दे लेखाआक्षेपाने अधोरेखित करण्यात आले. हे ५२ मुद्दे बांधकाम, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे पंचायत राज समितीने मंगळवारच्या बैठकीत यावर
सखोल चर्चा होण्याऐवजी सदरची बैठक फक्त दोनच तासांत गुंडाळण्यात आली. यातील महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेने पंचायत राज समितीची चांगली बडदास्त ठेवली आहे. त्यांना राहण्यासाठी अलिबाग येथील तीन तारांकित हॉटेलमध्ये सोय केली आहे. मॅपल आयव्ही हॉटेलमधील एका दिवसाचे भाडे तब्बल साडेसहा हजार रुपयांच्या आसपास आहे, तर रविकिरणचे सुमारे साडेतीन ते चार हजार रुपये आहे. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध पदार्थांचा खजिना तत्पर केला आहे, तसेच समितीमधील सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दिमतीला ५२ गाड्यांचा ताफा दिल्याचे बोलले जात आहे.
>दौºयामध्ये सर्व सुखसोयींमध्ये कोणतीच असुविधा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. पंचायत राज समितीला सुविधा पुरवताना अंगणवाडी सेविकांपासून ते थेट अधिकाºयांची चांगलीच ‘पंचायत’ झाल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

Web Title: Hundreds of billions of panchayats for Panchayat Raj Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.