अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बोगस मजूर घोटाळा विधिमंडळात पोहोचल्यानंतर सरकारने चौकशी अधिकारी नेमल्याने बोगस मजूर संस्थांमध्ये खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात निवृत्त सरकारी वेतनधारक, नोकरीत असणाऱ्या, तसेच करोडपती मजूर म्हणून नोंदणी केलेल्या मजूर सहकारी संस्थांना गेल्या पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ इतकी रक्कम वाटप केल्याचे समोर आले आहे.अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांना सदरची माहिती अधिकारात प्राप्त झाली. जिल्ह्यात मजूर संस्थामध्ये घोटाळा असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण विधिमंडळात पोहोचले.संजय सावंत यांना माहिती अधिकारात रायगड जिल्ह्यात मजूर म्हणून नोंद केलेल्या तसेच त्यांच्या बाबतीत तक्रारी झालेल्या संस्थांना गेल्या पाच वर्षांत तब्बल २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ इतकी रक्कम वाटप केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात चर्चा आहे.बोगस संस्थांचा अनागोंदी कारभारमजुरांच्या संस्था स्थापन करून मजुरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला; पण पांढरपेशी मजुरांच्या शिरकावाने यात अनागोंदी माजल्याचे दिसून येते. नियमाप्रमाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावर याबाबत जबाबदारी आहे; परंतु ते काहीच करीत नसल्याचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा आरोप आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पांडुरंग खोडका यांच्याशी संपर्क साधला असता, नागपूर येथील अधिवेशनात असल्याचे त्यांनी सांगितले.303 रायगड जिल्ह्यात मजूर सहकारी संस्थांची संख्याकामवाटप करताना ठरावीक 161 मजूर संस्थांनाच कामवाटप करण्यात आले142 संस्थांना कोणतेही काम देण्यात आलेले नसल्याचे दिसत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
बोगस मजूर संस्थांना शेकडो कोटींचे वाटप, पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ रक्कम वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 4:14 AM