लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरावरून ‘ऐश्वर्या’ या जंगलजेटीत विना मास्क शेकडो प्रवासी प्रवास करी आहेत. तरीही मेरीटाइम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोरोना वाढू नये या करिता राज्य सरकारमार्फत नियमावली जारी केली आहे. घराबाहेर पडताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत करण्यात येत आहे. मात्र, ऐश्वर्या जंगलजेटीचे कॅशिअर यांनी राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. जंगलजेटीत प्रवासाच्या सुरक्षितेसाठी सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे तसेच विना मास्क प्रवाशांना प्रवेश करू न देणे, सोशल डिस्टन्सचे पालन आवश्यक असताना, प्रवासी नेमकेच घेणे बंधनकारक असताना मोठ्या संख्येने प्रवासी घेतले जात आहेत. यावरून कोराेनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रवासी कुठून आला आहे, त्याचे टिप्पण नाही. जर यामधुन एखादा प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जत : तालुक्यात कोरोनाबद्दल जास्त गांभीर्य नाही. कर्जतकर बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शनिवारी एक कोरोना पॉझिटिव्ह, तर रविवारी चार कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता वाढली आहे. आजपर्यंत तालुक्यात १९१९ रुग्ण सापडले असून, १८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १३ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.दहिवली येथील एका ६४ वर्षांच्या व्यक्तीचा, कर्जत शहरातील एका ३० वर्षांच्या महिलेचा, भिसेगावमधील एका ४९ वर्षांच्या महिलेचा व नेरळमधील एक वर्षाच्या बालिकेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी गुंडगे गावातील एका ६३ वर्षांच्या महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.