वादळाने कोसळले कारली शेतीचे मांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:06 AM2018-04-24T01:06:46+5:302018-04-24T01:06:46+5:30
शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान : कर्जत तालुक्यातील चई येथील घटना
कर्जत : कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्ह्यालगत असलेल्या भागाला वादळी वाºयासह आलेल्या पावसाने झोडपले होते. त्या वादळामुळे चई भागातील शेतकºयाचे कारले भाजी मांडव मोडून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांचे सुमारे दोन लाख रुपयांंचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी घेतलेले उसने पैसे कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.
कर्जत तालुक्यातील चई भागात काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पाऊस आला होता. त्या पावसाने त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चई येथील शरद कान्हू शिंगोळे हे शेतकरी गेली २० वर्षे एकाच ठिकाणी कारली व भाजीपाला शेती करतात. त्यांच्या शेताजवळ असलेल्या विहिरीमधील पाणी शिंगोळे हे कावडीच्या साहाय्याने शेतापर्यंत आणतात. ते पाणी कारली पिकाला शिंपडून शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. त्यासाठी शिंगोळे हे नोव्हेंबर म्ािहन्यापासून शेतात राबण्यास सुरुवात करतात. कारली भाजीपाला शेती करण्यासाठी मांडव बनवावा लागतो, त्यासाठी लाकडे गोळा करण्यापासून बियाणे लागवड करण्यापर्यंत सर्व कामे त्यांना एकट्याला करावी लागतात. तीन महिने अंगमेहनत केल्यानंतर एप्रिल महिन्यात कारली वेलीवर येतात.
शरद शिंगोळे हे दर चार दिवसांनी मुरबाड येथील बाजारपेठ गाठून १५० किलो कारल्यांची विक्र ी करून उत्पन्न मिळवितात. पूर्ण हंगामात ते किमान ५० ते ५५ वेळेस मुरबाड येथील बाजारपेठेत कारली विक्रीस नेत असतात. गेली २० वर्षे त्यांचा हा व्यवसाय आहे. या वर्षी केवळ चार वेळा शिंगोळे यांनी कारली बाजारपेठेत विक्रीस नेली होती; परंतु आता त्यांचा कारल्याचा मांडव वादळी पावसात मोडल्याने बाजारपेठेत कारली घेऊन जाणे शक्य होणार नाही. वादळी वाºयासह जोरदार पाऊस आल्याने शेतात मांडव करण्यासाठी मातीत उभे केलेले बांबू एकामोगोमाग एक कोसळून संपूर्ण मांडव कोसळून संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे.
शरद शिंगोळे यांनी या शेतीकरिता ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, केवळ चार वेळा कारली बाजारपेठेत नेता आल्याने केलेला खर्च आणि चार महिने घेतलेली मेहनतही फुकट गेली आहे. मे अखेरपर्यंत कारली भाजीपाला विकून शिंगोळे किमान दोन ते अडीच लाख मिळवतात; परंतु यावर्षी वादळी वाºयासह आलेल्या अवेळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून नुकसान भरपाई मिळू शकल्यास त्यांना पुढे मार्ग काढता येणार आहे.