पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं केली त्याची हत्या, अलिबागमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 08:05 AM2017-10-25T08:05:16+5:302017-10-25T11:56:21+5:30
पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील थळ तालुक्यातील ही घटना आहे.
रायगड : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील थळ तालुक्यातील ही घटना आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आणि मृतदेह खड्ड्यात पुरला. यानंतर या महिलेनं स्वतः पोलिसांपुढे शरणागती पत्करत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
महिलेनं पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता. नव-याच्या जाचाला कंटाळल्यामुळे त्याला जीवे मारल्याचा दावा पत्नीने केला आहे. हरिश्चंद्र कोळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यमुना कोळी या महिलेला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी यमुनाने पतीची हत्या केली व त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता.
पती वारंवार छळत असल्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून त्याची हत्या केल्याचे यमुनाने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारी (24 ऑक्टोबर) रात्री पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिने स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.