हुतात्मा भाई कोतवालांना आदरांजली
By admin | Published: January 4, 2016 02:01 AM2016-01-04T02:01:16+5:302016-01-04T02:01:16+5:30
हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरु द्ध लढताना २ जानेवारी १९४३ ला सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली.
कर्जत : हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरु द्ध लढताना २ जानेवारी १९४३ ला सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी २ जानेवारीला दरवर्षी कर्जत तालुक्यातील मानिवली हुतात्मा स्मारकात या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. शनिवारी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन शनिवारी सकाळी १० वाजता पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती व केंद्र दहीवली-मालेगाव यांच्या विद्यमाने मानिवली येथील स्मारकाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी हुतात्मा वीर भाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले. हुतात्म्यांच्या नातेवाइकांचाही सत्कार करण्यात आला. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुण्यभूमीतून ज्योत पेटवून ही मशाल संपूर्ण मानिवली गावात फिरून गावातील तरु ण मशाल घेऊन सिद्धगडावर जातात. २ जानेवारीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना मानवंदना दिली. तसेच मानिवली येथील हुतात्मा स्मारकात खांडस विभागातील २२ शाळांनी विविध संस्कृतिक कार्यक्र म, देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी आमदार सुरेश लाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)