खारघरमध्ये सेलिब्रेशन संकुलात शिरला तरस, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
By वैभव गायकर | Updated: January 14, 2024 19:21 IST2024-01-14T19:21:14+5:302024-01-14T19:21:40+5:30
रहिवाशांनी या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.

खारघरमध्ये सेलिब्रेशन संकुलात शिरला तरस, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
पनवेल: खारघर शहरातील सेक्टर 16 वास्तुविहार सेलिब्रेशन सोसायटीत दि.14 रोजी पहाटे 4 वाजुन 30 मिनिटांनी तरस (हायना) दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरन आहे.अतिशय हिंस्त्र समजला जाणारा प्राणी जंगलात मोठ्या मोठ्या प्राण्यांनी केलेली शिकार त्यांच्या तोंडातून पळवत असतो.
सेलिब्रेशन सोसायटीत निखिल सुर्वे यांना पारिजात व उत्सव सोसायटीच्या मधोमध हा तरस फिरताना दिसल्याने त्यांनी या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात कोल्हे पाहिले गेले आहेत.या सोसायटीच्या मागील बाजूस खाडीतील खारफुटीचे जंगल असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत.मात्र या तरसामुळे सोसायटीत वास्तव्यास असलेले रहिवासी,लहान मुलांना धोका असल्याचे भाजप पदाधिकारी समीर कदम यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्राण्याला पकडून जंगलात सोडाव. अशी मागणी कदम यांनी केली आहे.याबाबत वनविभागाचे अधिकारी डी एस सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवु शकला नाही.