शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कर्जत मतदारसंघाचीही मी लेक; अदिती तटकरे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:39 AM

कर्जतमध्ये कार्यकर्त्यांशी साधला संवाद

कर्जत : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष आणि समविचारी पक्षाच्या महाआघाडीला रायगड जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. मला राज्यमंत्रिपद आपल्या सर्वांच्या सदिच्छेने मिळाले. मी श्रीवर्धन मतदारसंघात मते मागताना श्रीवर्धनची लेक आहे म्हणून मते मागितली. त्याचप्रमाणे मी आता कर्जत मतदारसंघाचीही लेक आहे. कोणत्याही कामासाठी मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. असा शब्द नवनिर्वाचित राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी येथे दिला.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कर्जत मतदारसंघातील माजी आमदार सुरेश लाड यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी अदिती तटकरे कर्जतमध्ये आल्या होत्या. या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्या राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या होत्या. अदिती तटकरे यांनी पुढे बोलताना, मला मार्गदर्शन करायला बाबा असले तरी त्यांच्याशी बोलताना मला कधी कधी मर्यादा असतात; पण सुरेश लाड यांच्याशी मनमोकळे बोलणे होते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल. ते सभागृहात आल्यास मला आनंदच होईल, असे स्पष्ट करून मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करीन.जिल्हा परिषद अध्यक्ष असताना निधीबाबत थोडे डावे उजवे झाले असेल; पण आता ती वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले. सुरेश लाड यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, हनुमंत पिंगळे, परिषद सभापती नरेश पाटील, उमा मुंढे, जिल्हापरिषद सदस्य सुधाकर घारे, एकनाथ धुळे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे