‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना ठरतेय सकारात्मक; हेल्पलाइनद्वारे जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:18 AM2019-02-12T05:18:29+5:302019-02-12T05:18:38+5:30

जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे.

 The idea of 'hello forrest' is positive; Successful development of 36 species in the district through helpline | ‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना ठरतेय सकारात्मक; हेल्पलाइनद्वारे जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात यश

‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना ठरतेय सकारात्मक; हेल्पलाइनद्वारे जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात यश

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वणवे लागलेल्या ठिकाणी तेथील वणवे अधिक उग्ररुप धारण करण्याआधीच वन विभागाची मदत पोचल्याने वन्य जीवांच्या रक्षणासाठी ‘हॅलो फॉरेस्ट’ही संकल्पना सकारात्मक ठरत आहे. वन विभागाचा हेल्पलाइन नंबर सातत्याने खणखणत असल्याने नागरिकांमध्ये ‘हॅलो फॉरेस्ट’बाबत जागृती होत असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. समुद्राबरोबरच येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने त्याच्या सौंदर्यात भरच पडते. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे उन्हाळ््याच्या मोसमामध्ये शेतीची मशागत सुरु असते. त्यावेळी शेतात लावलेल्या आगीमुळे एखादी ठिणगी वनसंपदा नष्ट करण्यास कारणीभूत ठरते. जळती सिगारेट गवतामध्ये फेकल्यानेही आग लागण्याचे कारण ठरत आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील अतिउष्णतेमुळे दगडाच्या घर्षणामुळे ठिणगी उडूनही गवत पेटल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व प्रकारांमुळे वनांना वणवे लागण्याच्या घटना घडत असतात. रात्री अपरात्री वणवे लागल्यास त्याबाबत काहीच माहिती मिळत नसायची. त्यामुळे मोठ्या संख्येने वनसंपदा जळून खाक होत होती. तसेच काही वेळेला वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसणे, जंगलाची अनधिकृत तोड करणे, वन जमिनीतून बेकायदा उत्खनन करणे अशा घटनाही सातत्याने घडत होत्या.
वन विभागाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्वच ठिकाणी लक्ष देणे कठीण होते. यासाठी ६ जानेवारी २०१७ साली सरकारने ‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. यासाठी १९२६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी खुला करण्यात आला. अलिबाग, उरण, कर्जत, पनवेल तालुक्यातील नागरिकांनी या हेल्पलाइनचा आतापर्यंत सर्वाधिक वापर केला आहे. २०१७ या कालावधीत १० आणि २०१८मध्ये २६ वणवे लागण्याच्या घटना घडल्याबाबत त्यांनी माहिती वन विभागाला दिली आहे. त्यामुळे वन विभागाला वेळीच उपाययोजना करणे शक्य झाले आहे. तातडीने त्या ठिकाणी मदत पोचवून आग विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वेळीच माहिती उपलब्ध झाल्याने लागलेल्या वणव्याचे रूपांतर फार मोठ्या आगीत झालेले नाही. त्यामुळे वन संपदेचे होणारे नुकसान टाळता आले आहे.

‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाइनवर कोणीही सर्वसामान्य नागरिक वनविभागाशी संबंधित तक्र ार करु शकतो. तक्र ार केल्यानंतर मुंबई येथील केंद्रीय नियंत्रण कक्षातून संबंधित वन अधिकाऱ्यांना एसएमएस येतो. त्यानंतर वन अधिकारी संबंधित अधिकाºयाकडे माहिती देतो. त्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाते. त्यानंतरही नियंत्रण कक्षातून त्या तक्रारीचा पाठपुरावा केला जात असल्याने तक्रारी सुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

तत्काळ मदत पोचवणे सहज शक्य
रायगड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या बेकायदेशीर शिकारी केल्या जातात. जैवविविधता धोक्यात आणणारी ही बेकायदेशीर शिकार रोखण्यासाठीही या हेल्पलाइनचा वापर आता रायगड जिल्ह्यात होत आहे. २४ तास कार्यरत असणाºया या हेल्पलाइनमुळे वनविभाग कर्मचारी, वनसमितीचे सदस्य, सर्पमित्र, निसर्ग मित्र यांच्या मदतीने तत्काळ मदत पोचवणे सहज शक्य झाले आहे.
त्याचप्रमाणे मालकी क्षेत्रात शिरणाºया वन्य प्राण्यांमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते. हे वाचविण्यासाठीही ही हेल्पलाइन उपयुक्त ठरत आहे. काही लोकांच्या घरामध्ये साप शिरल्याच्या तक्रारी हे हेल्पलाइनवर आल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्प मित्रांना तेथे पाठवणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या तक्र ारीचे तत्काळ निरसन केले जात असल्याने या हेल्पलाइनची चांगली मदत होत आहे.

वणवे लागल्याने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कारण वणवे लागल्याची माहिती खूपच उशिरा मिळत होती. हेल्पलाइनवर मोठ्या संख्येने फोन, एसएमएस येत असल्याने लागलेले वणवे तातडीने आटोक्यात आणण्यात यश येत आहे. नागरिकांमध्ये चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे वनांसह वन्य प्राण्यांचे रक्षण करता येत आहे.
- मनीष कुमार, जिल्हा वन अधिकारी, रायगड

Web Title:  The idea of 'hello forrest' is positive; Successful development of 36 species in the district through helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग