सात शाळांना आदर्श शाळा पुरस्कार
By admin | Published: July 29, 2016 02:45 AM2016-07-29T02:45:33+5:302016-07-29T02:45:33+5:30
आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा आदर्श जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी घ्यावा आणि राज्यामध्ये शिक्षणाच्याबाबतीत चांगला आदर्श निर्माण करावा, असे आवाहन
अलिबाग : आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा आदर्श जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी घ्यावा आणि राज्यामध्ये शिक्षणाच्याबाबतीत चांगला आदर्श निर्माण करावा, असे आवाहन सुरेश टोकरे यांनी केले. रायगड जिल्ह्यातील सात शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. पुरस्कार प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे टोकरे यांनी कौतुक केले.
रोहे तालुक्यातील विष्णूनगर धाटाव येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम ३० हजार रु पये देऊन गौरविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर या शाळेलाही ३० हजार रु पयांचे रोख बक्षीस देण्यात आले. माणगाव तालुक्यातील रानवडे, खांदाड जिल्हा परिषद शाळा अनुक्र मे २५ हजार आणि ७ हजार ५००, म्हसळा तालुक्यातील बनोटी जिल्हा परिषद शाळा (२५ हजार), महाड तालुक्यातील मुठवली आणि रावढळ उर्दू यांना अनुक्र मे १५ हजार आणि ७ हजार ५०० रु पये देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रतोद वैशाली सावंत, जिल्हा परिषद सदस्या कौशल्या पाटील, मीनाक्षी रणपिसे, अंजली पाटील, शेषराव बडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)