सरकारी कार्यालयेच थकबाकीदार, तर सामान्यांकडून कर वसुली कशी होणार

By निखिल म्हात्रे | Published: March 17, 2024 04:12 PM2024-03-17T16:12:43+5:302024-03-17T16:12:58+5:30

७० लाखांची थाकबाकी, अलिबाग नगरपालिकेची वसुली करताना दमछाक

If only the government offices are in arrears, how will the tax be collected from the common people | सरकारी कार्यालयेच थकबाकीदार, तर सामान्यांकडून कर वसुली कशी होणार

सरकारी कार्यालयेच थकबाकीदार, तर सामान्यांकडून कर वसुली कशी होणार

अलिबाग : शहरातील २५ हून अधिक शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेच्या विविध करांची सुमारे ७० लाखांहून अधिक थकबाकी आहे. नगरपालिकेच्या वसुली पथकाने वेळोवळी नोटीस पाठवूनही थकबाकी भरली जात नाही. त्याचा थेट परिणाम अलिबाग शहराच्या विकासकामांवर होत आहे.

मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. मात्र, त्याचीच दरवर्षी मोठी थकबाकी असते. निवासी थकबाकीदारांसह व्यावसायिक व सरकारी कार्यालयेही यात मागे नसतात. अलिबाग नगरपालिका हद्दीतील सरकारी कार्यालयांची तर ७० लाखांची थकबाकी आहे.
आलिबाग नगर परिषदेने यंदा मालमत्ता कराचे उद्दिष्ट १० कोटी रुपये ठेवले होते. त्यातील आतापर्यंत फक्त ५१ टक्के करवसुली झाली आहे. मार्च अखेर थकबाकी वसुली होणे गरजेच असल्याने कर विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. नगर परिषद अलिबाग हद्दीत असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डापर्यंत सर्व शासकीय कार्यालये तसेच काही इतर नावाजलेल्या संस्थांचादेखील मालमत्ता कर थकीत आहे.

वसुली पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांकडून करवसुली करीत आहेत. नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन करवसुलीचा आढावा घेतला जात आहे. नियुक्त विशेष पथके शहरातील विविध भागांत करदात्यांच्या भेटी घेऊन करवसुली करीत आहेत.

मार्च अखेरपर्यंत १०० टक्के घरपट्टी वसुलीचा संकल्प आहे. त्यादृष्टीने कर विभाग कामाला लागला आहे. करवसुलीसाठी विविध पथके तयार करून करवसुली करीत आहेत. तसेच, घरपट्टी करवसुलीमध्ये शासकीय कार्यालयांची अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
- अंगाई साऴुंखे, प्रशासक तथा मुख्याधिकारी अलिबाग नपा.

शासकीय कार्यालयांची एकूण थकबाकी रुपयांत -
रायगड जिल्हा परिषद, इमारत - १,१२,६७७.
जिल्हा शल्यचिकित्सक नर्सेस कॉटर्स - ५१,८६५.
जिल्हा रुग्णालय अलिबाग - ४,१५,५५९
जिल्हा शल्यचिकित्सक - १,०५,७५९.
जिल्हा शल्यचिकित्सक - ३, ९९,७३७.
जेल अधीक्षक - ६०, ६५२.
जिल्हाधिकारी रायगड - १,३०,२९६.
जिल्हाधिकारी - ७०,६४०.
रा.जि.प. सभापती निवास - ६३, ९१७
पोलिस अधीक्षक रायगड - २,३५,४४९
पोलिस अधीक्षक रायगड - १,९८,७८७
जिल्हा नियोजन समिती - १, ५८, ०५९
जिल्हा नियोजन समिती - १,२२,९४५
जिल्हा उद्योग केंद्र - १,३०,१९८
महावितरण गोदाम - ५४,४८०
एमएसईबी - १,४७,०८९ .
कुलाबा जिल्हा मुलकी सेवक वर्ग कल्याण निधी - ५०, ६०६.
चेअरमन कुलाबा जिल्हा मुलकी सेवक वर्ग कल्याण निधी - ५८८४६

Web Title: If only the government offices are in arrears, how will the tax be collected from the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.