शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

नोटाला जास्त मते मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:15 AM

निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशिन वापरण्यात येते. या मशिनमध्ये नोटा असतो. मात्र, या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात येईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.

कर्जत : निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशिन वापरण्यात येते. या मशिनमध्ये नोटा असतो. मात्र, या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात येईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.पूर्वी निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होत होता. आता मात्र, मतदान प्रकियेत वेगवेगळे बदल होत आहेत. ईव्हीएम मशिनद्वारे निवडणूक प्रक्रि या होत आहे. मात्र, त्या बाबत अनेक तक्रारी येऊ लागल्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनच्या बरोबर व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएमवर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडते, त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्र म आणि निवडणूक चिन्ह दिसते. या पद्धतीचा अवलंब आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच केला जाणार आहे.निवडणुकीत पारदर्शकता आणण्याकरिता मुख्य निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे. व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीमुळे कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला समजू शकणार आहे. मतदाराला त्याचे मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच पडले आहे याची खात्री करून घेता येणार आहे.ईव्हीएम मशिनवर असलेल्या मतपत्रिकेवरील कोणताच उमेदवार मतदारांच्या पसंतीचा नसल्यास त्यांना बॅलेट युनिटवरील नोटा या पर्यायासमोरील बटण दाबण्याचा पर्याय स्वीकारता येतो. मतपत्रिकेवरील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांपेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक नामनिर्देशापासून पुन्हा घेण्यात येणार आहे. पुन्हा घेतलेल्या निवडणुकीमध्ये नोटाला मिळालेल्या मतांचा विचार न करता, ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते प्राप्त होतील त्या उमेदवारास विजयी म्हणून घोषित करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशाच्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे.नगरपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्यास आजपासून सुरुवातकर्जत : कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी रोजी आहे. बुधवार, २ ते ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशपत्र भरण्याचा कालावधी आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र संगणक प्रणालीवर भरायची आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरण्यासाठी वेबसाइट २ जानेवारी सकाळी ११ ते ९ जानेवारी दुपारी २ या कालावधीत सुरू राहणार आहे. वेबसाइटवर उमेदवार रजिस्ट्रेशन करून लॉगइन करावे लागणार आहे. यावर नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरून नामनिर्देशनपत्राची तपासणी करून आवश्यक असल्यास त्यात दुरु स्ती करू शकतात. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र यांची प्रिंटाउट घेऊन आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षºया करून संबंधित निवडणूक अधिकाºयांकडे विहित कालावधीत सादर करावी लागणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.

टॅग्स :Karjatकर्जत