लोकमत न्यूज नेटवर्क माणगाव : दोन वर्ष महाराष्ट्रातील विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज खोटेनाटे आरोप करून अनाठायी बदनामी करीत आहेत. त्यांचे षडयंत्र आहे. त्यांची पोटदुखी सुरू आहे. त्याला आम्ही भीक घालणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. ती तुटणे शक्यच नाही. महाराष्ट्राला दिलेली वचने आणि आश्वासने पाच वर्षात पूर्ण करून दाखवू. प्रेमाने आलात तर बाजूला बसवू. जर तलवार घेऊन आलात तर तो वार परतविण्याची ताकद आमच्यात असल्याचा घणाघात करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले. माणगाव शहरातील जे. बी. सावंत, टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालय बामणोली रोड येथे जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.
कोकणात पर्यटनास मोठी संधी आहे. त्यामुळे विविध विकास योजनेतून निधी उभारला जात आहे. मात्र दोन वर्षे कोविड काळात विविध माध्यमातून कोविडवर मात करण्याचे काम यशस्वीपणे सरकारने केले आहे. सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. तसेच डिझेल, पेट्रोलचे भाव वाढत आहेत. मात्र राज्य सरकारने सीएनजीवरील टॅक्स कमी करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. दरम्यान, रायगडमध्ये दोन-दोन वादळे, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर या नैसर्गिक आपत्तींचा रायगडकरांनी जिद्दीने सामना केला. त्यांच्या या जिद्दीपुढे मी नतमस्तक होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने १ हजार ४० कोटी रुपयांचे पॅकेज मदत म्हणून देण्यात आले. रायगडसाठी जूनमध्ये रोजगार मेळावा होणार असून, रायगडला मुंबईला जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन वाघnआगामी निवडणुकीत या आमदारांमध्ये वाढ कशी होईल, यासाठी संघटनात्मक प्रयत्न केल्यास रायगड जिल्ह्यात सातपैकी सात आमदार निवडून येऊ शकतात. nयेत्या रायगड जि.प. निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे ध्येय ठेवूनच आतापासून कामाला लागा. nरायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होईल, असा आत्मविश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगाव येथील शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला. nत्यानंतर शिवसैनिकांनी टाळ्यांचा मोठा कडकडाट करून त्यांना दाद दिली.