"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:05 PM2024-04-07T18:05:36+5:302024-04-07T18:05:55+5:30
पालकमंत्री उदय सामंत यांची महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका.
उरण : उरणच्या सभेसाठी अटलसेतुवरुन आलात आणि शिव्या घालुन गेलात. शिव्या घालायच्या असतील तर आम्ही बांधलेले रस्ते, अटलसेतुवरुन येऊ नका.समुद्रमार्गे बोटीतून या. अशी बोचरी टिका राज्याचे उद्योगमंत्री व रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे नेते व उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता मेळाव्यातुन केली.
मावळ लोकसभेच्या उरण विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याचा मेळावा रविवारी जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात राज्याचे उद्योगमंत्री व रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यातून मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.उरण येथील ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर केलेल्या टिकेचा धागा पकडून पालक मंत्री उदय सामंत यांनी भाजप आघाडीच्या केंद्र व राज्य सरकारने उभारलेले रस्ते अटलसेतुवरुन येऊन शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेले रस्ते, अटल सेतुवरुन येऊ नका.समुद्रमार्गे बोटीतून या. अशी बोचरी टिका महाविकास आघाडीचे नेते व उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता मेळाव्यातुन केली. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत फेसबुकवरून संवाद साधणारे असा उल्लेख करून खोटे बोलू पण रेटून बोलू हीच विरोधकांनी राजनिती अवलंबली असल्याची टिकाही सामंत यांनी केली.
रायगडमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.विरोधानंतर रसायनीत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे. सिडकोच्या नैना, एमएमआरडीए आणि इतर प्रकल्पाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादनाला येथील शेतकऱ्यांनाचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही जमीनी संपादन करण्यात येणार नाही नसल्याची ग्वाहीही पालक मंत्री उदय सामंत यांनी दिली.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनीही व्यासपीठावरुन बोलताना नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता.याला उत्तर देताना विरोधकांनी सत्तेत असताना विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या नावाखाली षडयंत्र रचले होते. मात्र आता राज्य सरकारने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे सामंत यांनी भाषणातून सांगितले.मावळ लोकसभा मतदारसंघात संघात कुणीही ओळखत नसलेल्या उमेदवारापेक्षा विकासाची कामे केलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहनही सामंत यांनी यावेळी भाषणातून केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणातून दहा वर्षांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत उरण मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही व्यासपीठावरुन धनुष्य बाण निशाणीची घोषणा करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी भाजप आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली.तसेच यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, अतुल पाटील यांचीही भाषणे झाली.